दिवाळीतील बर्फी, लाडू, चिवडा, चकली, पेढे जमा करणाऱ्यांचे काय? नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाहतूक शाखा क्रमांक (1) वजिराबाद येथील दोन पोलीस अंमलदारांना मोदके जमा करण्याच्या कारणावरून पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी नांदेडपासून 99 किलो मिटर दुर असणाऱ्या दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पाठवून दिले. ही बाब प्रशंसनिय आहे. पण त्या दोघांना पाठविल्यामुळे वाहतुक शाखेतील मोदक जमा करणारे आपले काम थोडेच बंद करणार आहेत. आता तर दिवाळीचा सण आहे आणि दिवाळीतील लाडू, चकली, बर्फी, चिवडा पेढे जमा करण्यासाठी एक वेगळी फौज तयार करण्यात आली आहे त्याचे काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. परवा दि.29 ऑक्टोबर रोजी पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी वाहतुक शाखा क्रमांक 1 वजिराबाद येथील पोलीस अंमलदार बापूराव केंद्रे आणि एच.के.सोनटक्के दोघांना त्वरीत प्रभावाने अनुक्रमे मुक्रामाबाद आणि मरखेल या दोन ठिकाणी पाठविले आहे. ही दोन्ही पोलीस ठाणे नांदेडपासून 99 किलो मिटरवर स्थित आहेत. या दोघांवर मोदके जमा करण्याचा आरोप आहे. पण या दोघांनी जी मोदके जमा केली त्यातील हिस्सा कोणाकडे आहे. हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. मोदके जमा करणाऱ्यांना डॉ.नीलाभ रोहन यांनी नांदेडहून रवाना केले. ते छान झाले. पण वाहतुक शाखेतील इतर मंडळी मोदके जमा करणार नाहीत याची काहीच शाश्वती नाही. सध्या दिवाळीचा सण सुरू आहे आणि या सणात दुकानदारांकडून बर्फी, लाडू, चकली, पेढे, चिवडा जमा करण्याचा एक नवीन प्रकार सुरू आहे. तो कसा थांबेल या प्रश्नाचे उत्तर सुध्दा मोठे अवघड आहे. पण बारी सर्वांचीच येते हे मात्र डॉ.नीलाभ रोहन यांच्या निर्णयातून नक्कीच कळते. Kanthak Suryatal Post Views: 297 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भाजपचे लोकशाही बचाव आंदोलन म्हणजे KFC चे चिकन बचाव आंदोलन! – सुजात आंबेडकर दिल्ली वैद्यकीय खरेदी घोटाळा: १५ लाखांची मशीन ३८ लाख रुपयांना खरेदी; ८४२ कोटींच्या घोटाळ्यात एसीबीच्या चार्जशीटमधून धक्कादायक खुलासे!