मुखेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जांब बुद्रुक येथे दुकानासमोर ठेवलेले ४०,००० रुपये किमतीचे १० गॅस सिलेंडर अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली आहे. ही चोरी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२:०० ते २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजेच्या दरम्यान झाली. याप्रकरणी फिर्यादी मिनाहॅज उमरसाब शेख, वय ३४ वर्षे, रा. जांब बुद्रुक यांच्या तक्रारीवरून मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ३७०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३-२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम करत आहेत. कार खरेदीच्या नावाखाली नांदेडमध्ये ७.७० लाखांची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – वसरणी भागात कार खरेदीचा सौदा करून देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची ७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना १८ ऑक्टोबर २०२५ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत घडली. आरोपी साबेर जमील खान उर्फ मन्नान शेख, रा. हबीबनगर आझमाबाद व मोईज अख्तर खान मस्तान, रा. किंग कॉलनी, बहादुरपुरा, हैदराबाद यांनी संगनमत करून फिर्यादीची दिशाभूल केली. फिर्यादी तसबीरसिंग हरजितसिंग हंजरा, वय ३२ वर्षे, रा. वसरणी यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १३९४/२०२६, बीएनएस कलम ३१८-४, ३१६-२, ३-५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करत आहेत. उमरीमध्ये नकली पोलीस बनून ७२ वर्षीय वृद्धाच्या सोन्याच्या अंगठ्या लांबवल्या उमरी (प्रतिनिधी) – उमरी येथील नगरपालिका चौकातील श्री व्ही.पी.के. पतसंस्थेसमोर एका अज्ञात भामट्याने पोलीस असल्याची बनावट बतावणी करून ७२ वर्षीय वृद्धाची फसवणूक केली आहे. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास आरोपीने वृद्धाची दिशाभूल करत त्यांच्या हातातील १,२०,५०० रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या व पोबारा केला. याप्रकरणी लक्ष्मण इरबा जोगदंड, वय ७२ वर्षे, रा. सावरगाव, ता. उमरी यांच्या फिर्यादीवरून उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ३१३/२०२६, बीएनएस कलम २०४, ३१९-२, ३-५ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत. हदगाव तालुक्यात पळसा शिवारात साडेतीन लाखांचे सोयाबीन जाळले; अज्ञाताविरुद्ध गुन्हा मनाठा (प्रतिनिधी)- हदगाव तालुक्यातील पळसा शेतशिवारात अज्ञात इसमाने शेतात रचून ठेवलेल्या सोयाबीनच्या ढिगाला आग लावून तब्बल ३ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. ही घटना २६ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२:०० ते सकाळी ०७:०० वाजेच्या दरम्यान घडली. शेतकरी रामराव शेकुराव म्हस्के, वय ५५ वर्षे, रा. पळसा यांनी काढणी केलेले सोयाबीन शेतात रचून ठेवले होते. याप्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २०२/२०२६, बीएनएस कलम ३२६-फ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भोपाळकर करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 391 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वाळू माफियांना पोलिसांचा इशारा! नांदेडमध्ये २८.१५ लाखांच्या साहित्यासह वाळू जप्त