कुंडलवाडी (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत कुंडलवाडी पोलिसांनी मौजे पिंपळगाव खुर्द येथे सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत तीन मोटारसायकली, रोख रक्कम आणि बदक छाप पत्ते असा एकूण १ लाख ३१ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांना पिंपळगाव खुर्द येथील मोकळ्या जागेत काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत हनुमंत मोहन मदनुरे (वय २५, रा. पिंपळगाव खुर्द), रामदास बापुराव बोगरे (वय ३५, रा. चिरली), फिरोज हाजीखान पठाण (वय २६, रा. पिंपळगाव खुर्द), अविनाश गंगाधर चिलकेवार (वय ३१, रा. पिंपळगाव खुर्द), आनंदा देवराव पिंगळे (वय २५, रा. चिरली), सोमनाथ मारोती जाधव (वय १९, रा. पिंपळगाव खुर्द) आणि लक्ष्मण मोगलाजी मदनुरे (वय ५२, रा. पिंपळगाव खुर्द, ता. बिलोली) हे सात जण आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन मोटारसायकली (एमएच २६ एजी ९४०४, एमएच २६ सीसी ०९७४ आणि एमएच २६ सीएस ८९०९) अंदाजे १ लाख २० हजार रुपये किमतीच्या, तसेच ११ हजार १४० रुपये रोख आणि बदक छाप पत्ते असा एकूण १ लाख ३१ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२२/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस अंमलदार संगेवार, पुजरवाड, बोलमवाड, देशमुख तसेच होमगार्ड गुंडमलवार यांनी केली. अवैध जुगार, मटका व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, अशा अवैध प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 77 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अर्धापूरमधील अनोळखी खुनाचा छडा; चार आरोपी जेरबंद