खूनाचा प्रयत्न करुन फरार असलेल्या आरोपीस पिस्टलसह ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कामगिरी
नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व गंभीर गुन्हयातील पाहिजे/फरारी आरोपीचा शोध घेवून अटक करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक, श्री उदय खंडेराय यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात पाहिजे/फरारी आरोपींना अटक करण्याबाबत स्था.गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते.
दिनांक 10/05/2024 रोजी गुप्त बातमीदाराकडून लालवाडी पुलाजवळ एक इसम गावठी पिस्टल बाळगुन असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठांना देवून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि साईनाथ पुयड व पोलीस अंमलदार असे लालवाडी पुलाजवळ आला असता सदर ठिकाणी सापळा लावून इसम नामे अतिष पिता विष्णु सुर्यवंशी, वय 23 वर्ष, व्यवसाय बेकार, रा. लालवाडी रेल्वेब्रिजचे बाजूस, शिवाजीनगर, नांदेड यास ताब्यात घेवून त्याचेकडून बेकायदेशीरीत्या बाळगलेली एक गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व एक मोबाईल असा एकूण 30,000/-रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरचा आरोपी हा 1. पो. स्टे. भाग्यनगर गु.र.नं. 272/2023 कलम 307, 326, 143, 147, 149 भा.दं.वि., 2. पो. स्टे. शिवाजीनगर गु.र.नं. 147/2024 कलम 324, 504, 34 भा.दं.वि. हे गुन्हे करुन, सदर गुन्हयात अटक करणे आहे.
सदरची कामगिरी कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा.श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा, नांदेड, पोउपनि श्री. साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार माधव केंद्रे, गुंडेराव करले, दिपक पवार, किशन मुळे, देवा चव्हाण, तानाजी येळगे, गजानन बयनवाड, मोतीराम पवार, ज्वालासिंघ बावरी, मपोकों / मेहजबीन