समूहगायन, समूह नृत्य, देशभक्तिपर गीत–काव्यवाचनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम; प्रवेश विनामूल्य नांदेड : ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संस्कृती मंत्रालय, भारत सरकार व सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य **‘वंदे मातरम् महोत्सव २०२६’**चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नांदेड येथे रंगणार आहे. देशभक्तीची भावना आणि भारतीय कला-संस्कृतीला अभिवादन करण्याच्या उद्देशाने आयोजित या महोत्सवात दुपारी १२ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यामध्ये समूहगायन स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण, विविध मान्यवरांचे नृत्य सादरीकरण तसेच देशभक्तिपर काव्यवाचन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. यासोबतच रील स्पर्धा तसेच आंतरशालेय निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ रात्री ८ वाजता आयोजित करण्यात आला आहे. वक्तृत्व स्पर्धा सायंकाळी ५ वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह परिसरात होणार असून इच्छुकांना त्यामध्ये सहभाग नोंदविता येणार आहे. या संपूर्ण महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून नांदेडकरांसाठी हा भरगच्च सांस्कृतिक व देशभक्तिपर कार्यक्रमाची मेजवानी ठरणार आहे. ‘वंदे मातरम्’ला विशेष अभिवादन आणि आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित या महोत्सवाचा नांदेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. सान्वी जेठवाणी, अध्यक्ष, सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड व विशेष कार्यकारी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 93 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दुष्काळ निवारणासाठी महसूल कर्मचाऱ्यांचा मदतीचा हात