नांदेड (प्रतिनिधी) – दिनांक 01 ते 30 सप्टेंबर, 2026 दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्रात गुटखा, मटका – जुगार, अवैध दारु विक्री, शस्त्र अधिनियम व इतर कलमांन्वये अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम -3 राबविण्यात आली. मोहिमे अंतर्गत, दिनांक 01 ते 30 सप्टेंबर, 2026 दरम्यान संपलेल्या महिना अखेर, नांदेड परिक्षेत्रात, गुटखा व्यावसायिकांविरुद्ध कलम 123 भारतीय न्याय संहिते अंतर्गत (31), महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत (297), महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये (978), शस्त्र अधिनियमान्वये (43), तर इतर अधिनियमांखाली (258), अशा एकूण (1607) कारवाया करुन (2596) इसमांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात निष्पन्न झालेल्या इसमांकडून 21,21,87,825/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिक्षेत्रातील विविध घटकांनी अवैध व्यवसाय निर्मुलन-3 मोहिमेमध्ये केलेल्या कारवाया पुढील प्रमाणे : जिल्हा गुटखा मटका/जुगार दारु शस्त्र अधिनियम इतर केसेस गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या गुन्हे मुद्देमाल किंमत आरोपी संख्या नांदेड 14 68,53,008 20 82 54,02,625 382 300 20,61,612 319 15 5,45,200 28 56 8,27,91,344 121 परभणी 6 5,02,480 12 71 47,46,551 237 204 9,05,667 211 9 1,05,440 11 48 4,65,28,154 73 हिंगोली 6 34,78,849 9 56 45,88,165 211 214 11,63,215 216 13 4,900 13 98 2,28,82,328 104 लातूर 5 27,17,215 7 88 1,06,56,755 277 260 11,16,610 270 6 1,000 11 56 1,51,36,707 64 एकुण 31 1,35,51,552 48 297 2,53,94,096 1107 978 52,47,104 1016 43 6,56,540 63 258 16,73,38,533 362 सदर कारवाईत, पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयातील विशेष पथकाने, नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्हयात मटका, जुगार व गुटख्याविरुध्द केलेल्या कारवाईचा समावेश आहे. उपरोक्त मोहिमेत, पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयातील विशेष पथकासोबतच, संबंधित जिल्हयातील पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखानी, पोलीस ठाणी व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. 1 ऑक्टोबर पासून परिक्षेत्रात अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम – 4 : नांदेड परिक्षेत्रात, ऑक्टोबर महिन्यात अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम -4 राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेअंतर्गत परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये गुटखा, मटका-जुगार, दारू, अंमली पदार्थ, अवैध वाळू उपसा व वाहतूक, वेश्या व्यवसाय, जीवनाश्यक वस्तू अधिनियम, अवैध प्रवासी वाहतूक इत्यादी विरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे. सदर मोहीम ही संपूर्ण ऑक्टोबर महिनाभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून, संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांना अवैध व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खबर हेल्पलाइन वरुन माहिती द्या : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहचवावी व आपल्या भागातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 83 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड ACB कारवाई: चहा पाजला नाही म्हणून अडवली NOC; अडीच लाखांची लाच मागणारे जाळ्यात! १.२० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात पकडले; नांदेडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागात खळबळ ना गणवेशावर बॅज, ना ओळखपत्र! पत्रकारांना आणि सामान्य नागरिकांना पोलिसांकडून बळजबरीने गाडीत कोंडले; जंतर-मंतरवर कर्फ्यूसारखी परिस्थिती!