नांदेड- येथील अकथ प्रकाशन संस्थेच्या वतीने शहरातील विसावा पॅलेस हॉटेल येथे भाद्रपद पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने एकशे बारावी काव्यपौर्णिमा घेण्यात आली. राज्यभरातील अनेक ठिकाणांहून उपस्थित झालेल्या कवी कवयित्री यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही काव्यपौर्णिमा रंगली. विविध विषयांवरील कवितांच्या सादरीकरणासह बुद्ध, धम्म आणि संघाचा सूर निनादला! काव्यपौर्णिमा या कविसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली येथील सुप्रसिद्ध कवयित्री सिंधूताई दहिफळे या होत्या तर अतिथी कवी म्हणून लातूर येथील कवी प्रा. पंढरी बनसोडे, नायगाव येथील गझलकार शंकर माने, माधव जाधव, नाना गायकवाड, देविदास वाघमारे, उमरखेड येथील सुमेध घुगरे, काव्यपौर्णिमेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे यांची उपस्थिती होती. भाद्रपद पौर्णिमेचे औचित्य साधून ११२ व्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागोराव डोंगरे, राहुल वाडे, विजय वाठोरे, थोरात बंधू, चंद्रकांत कदम, अनुरत्न वाघमारे, प्रकाश ढवळे, व्यंकटेश कंडारकर, सुनंदा भगत, ज्योती परांजपे/करवंदे , अर्चना भद्रे, उषाताई ठाकूर, सदानंद सपकाळे, तान्हाजी मालुसरे, माधव राहाटे, मारोती काळबांडे , सुभाष शिंगणकर, अलका मुगटकर , जीवन मांजरमकर, विशाल वाघमारे, दगडू घुगरे , संभाजी काळे, राजु सावतकर, जयसिंग चव्हाण, सोनबा दवणे, बालाजी वाढवे, विमल शेंडे, विकास डोळस यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदविला. एकापेक्षा एक सरस आणि सुरस कविता सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधले. सर्व सहभागी कवी कवयित्री यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी काव्यरसिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. Kanthak Suryatal Post Views: 414 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ज्ञान की छोटी पाठशाला – बोतल में शराब नहीं, शहद था!