देगलूर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत देगलूर पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यांवर धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत एकूण १ लाख ५९ हजार २७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली कारवाई मौजे खानापूर येथील सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली. पोलिसांना तेथे बेकायदेशीररीत्या तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने छापा टाकला. या कारवाईत गजानन बाबुराव खुशोबा, मानाजी हानटे (वय २५), विठ्ठल लक्ष्मण डुडळवार, लक्ष्मणराव डुडळवार (वय ३५), व्यंकट मानाजी गायकवाड, सदामैनोदीन पाशा, गजानन खुशोबा, वीरभद्र काशीनाथ शिवाचार्य आणि शंकर हाणमंत यांचा समावेश असल्याचे पोलिसांच्या प्रेसनोटमध्ये नमूद आहे. या ठिकाणी पंचांसमक्ष कारवाई करून तीन मोबाईल फोन अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण ६२ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६०/२०२६ अन्वये कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई देगलूर शहरातील शिवबानगर येथील मोकळ्या जागेत करण्यात आली. या ठिकाणीही तिर्रट जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकला. या कारवाईत लक्ष्मण लालुबोगुलवार (रा. जयभीमनगर, देगलूर), सुराज राजुकांबळे (वय २७, रा. आनंदनगर, देगलूर), विजय पंढरी दौडे (वय ४०, रा. सुभाषनगर, देगलूर), दिलीप गंगाधर गुगेवार (वय ४०), शिवाजी चव्हाण (वय १८, रा. कलामंदिर तांडा), सुनील विठ्ठलराव सावित्रीवार (वय ४०, रा. तुकाराम नगर, देगलूर) आणि पिराजी म्हैसाजी पुठेवाड (वय २७, रा. शिवबानगर, देगलूर) यांच्यासह इतर आरोपींचा समावेश असल्याचे नमूद आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी नऊ मोबाईल फोन अंदाजे ७६ हजार ३०० रुपये, रोख २० हजार ३६० रुपये व जुगाराचे साहित्य, असा एकूण ९६ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६१/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नांदेडचे पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, उपविभागीय पोलिस अधिकारी किरण पोपळघट तसेच परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक वैभव पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक हनमंत शिंदे, किरण बेंबडे, पोलीस अंमलदार केंद्रे, घुमे, मधुकर नामपल्ले आणि विशाल अटकोरे, सर्व देगलूर पोलिस ठाणे, यांनी सहभाग घेतला. अवैध जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर प्रकारांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू असून, नागरिकांनी अशा अवैध हालचालींची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 10 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये दोन ठिकाणी घरफोड्या; ९.८३ लाखांचा ऐवज लंपास