लातूर (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पोलीस पथकाने लातूर जिल्ह्यात धडक कारवाई केली आहे. या पथकाने लातूर शहरातील ३ आणि अहमदपूर येथील १ अशा एकूण ४ ठिकाणी मटका व जुगार अड्ड्यांवर छापे टाकून २८ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, २१ लाखांचा (रु. २०,८८,५९०/-) मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार प्रदिप खानसोळे, गणेश राठोड आणि गजानन डवरे यांनी या यशस्वी धाडी घातल्या आहेत. या कामगिरीबद्दल नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे. चार ठिकाणच्या कारवाया, जप्त मुद्देमाल व आरोपींची माहिती १. माताजी नगर, लातूर (विवेकानंद चौक पोलीस ठाणे हद्द) कारवाई: माताजी नगर येथील पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या मटका बुकीवर छापा टाकून रु. ७,४२०/- रोख आणि रु. ४२,४००/- किमतीचे ५ मोबाईल जप्त केले. गुन्हा: विवेकानंद चौक पोलीस ठाणे (गु.र.नं. ६४२/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायदा). ताब्यात घेतलेले आरोपी (६ जण): कलिम मेहताबसाब तांबोळी (रा. माताजी नगर, लातूर) चंदपाशा महंमदसाब सय्यद (रा. रांगापूर, ता. जि. लातूर) गणेश धोंडीराम होळे (रा. सुळ गल्ली, लातूर) फिरोज करिम शेख (रा. राईस्लामपुरा, लातूर) बालाजी शिवाजी वाघमारे (रा. सोनवती, ता. जि. लातूर) गोविंद पाटील (रा. राजाण्णाभाऊ साठे चौक, लातूर) २. कातपूर रोड, लातूर (विवेकानंद चौक पोलीस ठाणे हद्द) कारवाई: कातपूर रोडवरील गाळ्यात चालणाऱ्या बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी सेंटरवर छापा टाकून रु. ३,६९०/- रोख व इतर साहित्यासह रु. २४,१९०/- चा मुद्देमाल जप्त केला. गुन्हा: विवेकानंद चौक पोलीस ठाणे (गु.र.नं. ६४३/२०२६, कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायदा). ताब्यात घेतलेले आरोपी (४ जण): प्रदिप जगन्नाथ लोखंडे (रा. स्वामी समर्थ नगर, लातूर) प्रदिप पाटील (रा. कव्हळा, ता. जि. लातूर) संतोष धनवे (रा. सुशीलादेवी कॉलेजजवळ, खाडगाव, लातूर) तुराब रज्जाक शेख (रा. बसवेश्वर चौक, लातूर) ३. बार्शी रोड, लातूर (एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्द) कारवाई: प्रमोद पेट्रोल पंपासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या मटका अड्ड्यावर कारवाई करून रु. ११,८६०/- रोख, रु. ५०,०००/- चे ५ मोबाईल आणि रु. ७१,५००/- चे संगणक साहित्य जप्त केले. गुन्हा: एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे (गु.र.नं. ६२७/२०२६, कलम १२(अ), ४(१)(a), ४(१)(g) महाराष्ट्र जुगार कायदा). ताब्यात घेतलेले आरोपी (६ जण): प्रविण विजयकुमार शेळके (रा. टाकळीशि, एम.आय.डी.सी. लातूर) शरद संतोष जाधव (रा. श्रीनिवास नगर, औसा, एम.आय.डी.सी. लातूर) सुमित रामेश्वर पलोड (रा. मोती नगर, एम.आय.डी.सी. लातूर) जसराज पंडीत मगर (रा. मोती नगर, एम.आय.डी.सी. लातूर) कार्तीक अशोक कदम (रा. औसा, एम.आय.डी.सी. लातूर) अमितसिंग शरदसिंग भिसेन (रा. जुना औसा रोड, एम.आय.डी.सी. लातूर) ४. काळेगांव रोड, अहमदपूर (अहमदपूर पोलीस ठाणे हद्द) कारवाई: काळेगांव रोडवरील एका बांधकामाधीन घरात पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्यांवर छापा मारून रु. २,४६,३००/- रोख, १४ मोबाईल, २ चारचाकी वाहने आणि ७ मोटारसायकली असा एकूण रु. १८,८१,३००/- चा मुद्देमाल जप्त केला. गुन्हा: अहमदपूर पोलीस ठाणे (गु.र.नं. ६०१/२०२६, कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायदा). ताब्यात घेतलेले आरोपी (१२ जण): अंकुश राम राठोड (रा. हनुमान टेकडी, अहमदपूर) आशुतोष संभाजी करामुंगे (रा. आदर्श कॉलनी, अहमदपूर) रविशंकर उमाकांत कुमदाळे (रा. थोडगा रोड, अहमदपूर) नामदेव बालाजी भगत (रा. साई नगर, अहमदपूर) जगन्नाथ भगवानराव शिंदे (रा. थोडगा रोड, अहमदपूर) पठाण शादुल्ला जंबीरसाब (रा. परचंडा, ता. अहमदपूर) रामेश्वर वासुदेव मारडकर (रा. हुमु, अहमदपूर) दयानंद बाबुराव चव्हाण (रा. लंजावाड, ता. भालकी) सय्यद सादर रहीम (रा. पालम, ता. पालम, जि. परभणी) संतोष संभाजी मुस्कावाड (रा. कुरुळा, ता. कंधार, जि. नांदेड) देवानंद पितांबर भगत (रा. गवळी गल्ली, अहमदपूर) अबुबक्कर फरज चारुस (रा. पालम, ता. पालम, जि. परभणी) एकूण जप्त मुद्देमालाचा तपशील चारही कारवायांमध्ये मिळून रु. २,६९,१९०/- रोख रक्कम, २४ मोबाईल, २ चारचाकी वाहने, ७ मोटारसायकली आणि संगणक साहित्य असा एकूण रु. २०,८८,५९०/- (सुमारे २१ लाख) किमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. खबर हेल्पलाइनवरून माहिती देण्याचे आवाहन परिक्षेत्रात अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 ही खबर हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी गुप्त माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 117 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation Gen Z चा आक्रोश, पेपर लीक अन् राजकीय गदारोळ: महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले!