नांदेडच्या वजीराबाद/हनुमान पेठ परिसरात  धगधगता  ज्वालामुखी? बालमजुरीचा जोर आणि  जातीय विद्वेषाचा छुपा डाव!

नांदेड (विशेष प्रतिनिधी) – नांदेड शहरातील वजिराबाद परिसर सध्या एका अत्यंत संवेदनशील आणि सामाजिक दृष्टिकोनातून चिंताजनक वळणावर उभा आहे. वरवर शांत दिसणाऱ्या या व्यापारी हबमध्ये आतल्या आत एक मोठी ठिणगी धुमसत असून, प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर नांदेडमध्ये कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

बालमजुरीचे उघड चाललेले साम्राज्य आणि प्रशासनाचे दुर्लक्ष!

वजिराबाद भागातील अनेक वेगवेगळ्या दुकानांमध्ये सर्रासपणे अल्पवयीन बालक आणि बालिकांकडून काम करून घेतले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अत्यंत कोवळ्या वयाच्या या मुला-मुलींच्या हातात पुस्तकांऐवजी कामाचे ओझे दिले गेले आहे. या अल्पवयीन मुलांना नोकरी कशी दिली गेली? त्यांच्याकडून कशा प्रकारे काम करून घेतले जात आहे? आणि त्यांचे शोषण कोण करत आहे? या गंभीर बाबींकडे कामगार आयुक्तालयाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. कामगार आयुक्तालयाने या संवेदनशील विषयाकडे त्वरित लक्ष देणे कायद्याच्या आणि माणुसकीच्या दृष्टीने आवश्यक बनले आहे.

अल्पवयीन मुलींची सुरक्षा आणि संशयास्पद वातावरण

या परिसरात आणखी एक विचित्र सामाजिक वास्तव पाहायला मिळत आहे. दुकानांमध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन मुली जेव्हा सकाळी कामासाठी येतात, तेव्हा त्यांच्यासोबत एक बॉयफ्रेंड असतोच. दुकान उघडेपर्यंत त्यांचे रस्त्यावर तासनतास गप्पा मारणे आणि यादरम्यान परिसरातील संशयास्पद वातावरण, यामुळे सामाजिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बालिकांच्या नावाचा वापर करून काही परप्रांतीय व्यापारी स्थानिक स्तरावर जातीय विद्वेष पसरवण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.

१९९० चे उपरे विरुद्ध तीन पिढ्यांचे रहिवासी – जातीय विद्वेषाचा कट?

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, इतर राज्यांमधून येऊन महाराष्ट्रात आणि विशेषतः नांदेडमध्ये स्थायिक झालेले काही व्यापारी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि वर्चस्वासाठी जातीय सलोखा बिघडवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत आहेत. जे स्थानिक लोक येथे तब्बल तीन-तीन पिढ्यांपासून शांततेने राहत आहेत, ते लोक आता १९९० मध्ये महाराष्ट्रात येऊन स्थायिक झालेल्या नवख्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यात खुपू लागले आहेत. स्थानिक रहिवाशांचा काटा काढण्यासाठी आणि त्यांना व्यवसायातून बाजूला करण्यासाठी या परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून वेगवेगळ्या जातीय क्लृप्त्या आणि कुटिल डाव रचले जात आहेत.

स्फोटक परिस्थिती: प्रशासनाला अंतिम निर्णय घेण्याची गरज 

व्यापाऱ्यांच्या या अशा जातीय कुरापतींमुळे वजिराबाद आणि संपूर्ण नांदेड शहरात कधीही सामाजिक स्फोट होऊ शकतो. ही परिस्थिती अत्यंत संवेदनशील असून स्थानिक शांतता धोक्यात आली आहे.

त्यामुळेच, प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणेने आता गाफील न राहता त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे. वजीराबाद मधील दुकानांमध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन बालक-बालिकांच्या समस्येकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन बालमजुरी रोखली पाहिजे. त्याचसोबत, शांतताप्रिय महाराष्ट्रात आणि नांदेड शहरात जातीय विद्वेषाचे विष कालवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा स्वार्थी व्यापाऱ्यांचा त्वरित बंदोबस्त करून त्यांची योग्य चौकशी झालीच पाहिजे, हीच आजची खरी सामाजिक गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!