हाच तो नराधम अखेर पोलिसांच्या ताब्यात 

सुतावरून स्वर्ग गाठत पोलिसांची धडक कारवाई: २ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सूर्यास्त होण्यापूर्वीच बेड्या!

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड पोलिसांच्या अत्यंत सतर्क आणि तातडीच्या कामगिरीमुळे एका दोन वर्षांच्या निरागस चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय नराधमाला गुन्हा घडल्याच्या अवघ्या काही तासांतच, म्हणजेच आजचा सूर्यास्त होण्यापूर्वीच पोलिसांनी जेरबंद केले आहे. सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या संतापजनक घटनेतील आरोपीला परभणी जिल्ह्यातील पालम येथील वन विभागात दडून बसलेल्या  विलास पंडित वाघमारेला ताब्यात घेण्यात आले.

चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अवघ्या दोन वर्षांच्या निरागस बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून एका ३५ वर्षीय नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तो तिथून पळून गेला. या संतापजनक घटनेमुळे पोलिसांसमोर आरोपीला तात्काळ शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.

पारंपरिक मागावरून तांत्रिक कौशल्याकडे गुन्हा घडल्याचे समजताच पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवली. सुरुवातीला पोलिसांनी आरोपीचा माग काढण्यासाठी पारंपरिक शोध पद्धतीचा अवलंब केला, परंतु पुढे त्याचा काहीच माग लागत नव्हता. अशा बिकट परिस्थितीत, एका सूक्ष्म धाग्यावरून शोध घेत पोलिसांनी तांत्रिक कौशल्याची मदत घेण्याचे ठरवले.

सूर्यास्त होण्यापूर्वीच नराधम गजाआड या तपासात डाटा विशेषज्ञ डॉ. नीलाभ रोहन  यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अत्यंत वेगाने काम केले. आधुनिक तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा अचूक माग काढला. अखेर, परभणी जिल्ह्यातील पालम येथील वन विभागात लपून बसलेल्या या नराधमाला पोलिसांनी सूर्यास्त होण्यापूर्वीच बेड्या ठोकल्या.

पोलिसांच्या या कौतुकास्पद आणि वेगवान कामगिरीची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत असून, समाजात पोलिसांबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सोनखेड पोलीस अत्यंत गांभीर्याने करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!