नांदेड (विशेष प्रतिनिधी) – सध्या बाजारात नवीनच हवा निर्माण झाली आहे. ती हवा म्हणजे आपले थोर, कर्तृत्ववान आणि जगप्रसिद्ध रुकम्या डाकू महाशय! सध्या रुकम्या डाकूंची छाती फुगून ५६ इंच झाली आहे, कारण त्यांचे लाडके सुपुत्र आता थेट राष्ट्रीय पातळीवर, म्हणजेच गोव्याच्या सायबर पोलिसांच्या दरबारात आपली कला सादर करण्यासाठी आमंत्रित केले गेले आहेत. पण, कमाल म्हणजे, लाजाळू वृत्तीचे हे रुकम्या डाकू सध्या गल्लीबोळात फिरून, बातमीत माझं नावच नाही, मी तर स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे, अशी मोठ्या दिमाखात वल्गना करत फिरत आहेत. काय हा निरागसपणा! रुकम्या डाकूजी, आम्ही तुम्हाला आजच ओळखायला लागलो नाही. तुमचा आणि आमचा जुनाच स्नेह आहे. तुमच्या पूर्वइतिहासावर आम्ही पूर्वीही प्रकाश टाकला आहे आणि आजही टाकत आहोत, त्यामुळे नांदेडच्या जनतेला रुकम्या डाकू कोण आहे हे नव्याने सांगण्याची अजिबात गरज नाही.
पण आमच्या दक्ष आणि सुजाण पत्रकारितेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. कायद्याचा आदर राखत आम्ही तुमच्या १८ वर्षे पूर्ण न झालेल्या सुपुत्राचे नाव उघड केले नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुमचे घरगुती प्रताप लपून राहतील. तुम्ही तर खुशाल तोंडाची वाफ दवडत आहात. पण, तुमचे ते महान नागपुरी काका काय करत होते? त्यांनी तुम्हाला बाल न्याय मंडळाच्या नियमावलीचा साधा अभ्यासही शिकवला नाही का? की नागपुरी संत्र्यांच्या गोडव्यात ते स्वतःच कायद्याचा कडू डोस विसरले? अहो डाकूजी, कायदा सांगतो की १८ वर्षांखालील मुलांचे नाव उघडपणे लिहिता येत नाही. आम्ही तुमचे नाव घेऊन तुमच्या मुलाचा उल्लेख केला, तरीही सुज्ञ वाचकांना सर्व काही समजते. म्हणूनच नाव अर्धवट ठेवले, पण तुमचा पुळका काही कमी होईना.
बरं, डाकूजी, इतकाच जर तुमच्या प्रामाणिकपणाचा आणि सच्चेपणाचा तोरा असेल, तर जरा त्या स्वर्गवासी पित्याची शपथ घेऊन सांगा बरं तुमच्या लाडक्या पुत्राला गोवा सायबर पोलिसांनी येत्या २५ ऑगस्ट २०२६ रोजी हजर राहण्याचे फर्मान सोडले आहे की नाही? सायबर पोलीस ठाणे, गोवा येथे हजर राहण्याचे हे शाही आमंत्रण तुमच्या मुलाला मिळाले आहे की नाही, हे जाहीरपणे सांगा.किंवा आमच्यावर कायदेशीर कार्यवाही करा.गोव्यात पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर आपली आणि आपल्या सुपुत्राची वाट पाहत आहेत. तुमचे प्रताप काही आजचे नाहीत. तुमच्या याच थोर कर्तृत्वामुळे तुमच्या स्वर्गवासी पित्याला हयातीत अनेकांच्या पाया पडावे लागले होते आणि नाक घासावे लागले होते, हे तुम्ही इतक्या लवकर विसरलात? की आता आम्ही त्या लोकांची नावे आणि तुमच्या त्या जुन्या पराक्रमांची यादी देखील जाहीर करावी?
तुमचा खोटेपणाचा आणखी एक उत्कृष्ट नमुना म्हणजे, तुम्ही जो पोलीस ठाण्यात आमच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला, तो कशाच्या बळावर? तर त्या पोलीस ठाण्यात तेव्हा एक लोखंडी पुरुष प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून बसले होते. पण लक्षात ठेवा, लोखंडालाही गंज चढतो,त्या लोखंडी पुरुषाला सुद्धा आम्ही गंज लावलाच, आणि कायद्याचे पाय खूप लांब असतात.
आता बातमी आहे ती गोव्याच्या त्या सायबर दौऱ्याची. आमचे तुमच्यावर इतके निस्सीम प्रेम आहे की, जर तुमची तयारी असेल, तर २५ ऑगस्ट २०२६ रोजी आम्ही स्वतः गोव्याच्या सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार आहोत. तिथल्या सुंदर निसर्गात, सायबर पोलिसांच्या उपस्थितीत तुमचा आणि तुमच्या त्या सुपुत्राचा कॅमेऱ्यात सुरेख फोटो काढू आणि मग एक जंगी बातमी प्रसिद्ध करू. ऐकण्यात तर असेही आले आहे की, तुमच्या आणि तुमच्या सुपुत्राच्या मदतीसाठी गोव्याच्या किनाऱ्यावर मोगली नावाचा एक अद्भुत प्राणीसुद्धा अवतरणार आहे! काय ही अपूर्व युती! मोगली, रुकम्या आणि सायबर पोलीस गोव्यात तर जणू काही आंतरराष्ट्रीय महोत्सवच भरणार आहे!
जर तुमचा मुलगा १८ वर्षांचा असता, तर गोवा पोलिसांनी त्याची मुंबई ते गोवा प्रवासाची चांगलीच प्रवास पोलीस कोठडी घेतली असती, हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.किंवा सायबर पोलीस तुमच्या सुपुत्राच्या स्वागताची जंगी तयारी करीत असतील. पण तो लहान असल्याने वाचला. आमच्याकडे तुमच्या मुलाच्या जन्माच्या प्रमाणपत्राचे अख्खे गाठोडेच तयार आहे. त्यामुळे वल्गना आणि खोट्या बाता मारणे बंद करा. वल्गना कधीच पूर्ण होत नसतात, ती फक्त कागदी वाघांची बडबड असते. खरा वाघ हा डरकाळी फोडतो आणि आम्ही जेव्हा डरकाळी फोडतो, तेव्हा रुकम्यांसारख्या डाकूंचे पाय थरथर कापायला लागतात. २५ ऑगस्टची वाट पाहा, गोव्याच्या सायबर पोलीस ठाण्यात सत्य आणि असत्याचा खेळ रंगणार आहे!
