पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव मन्ना गडमड, दत्ता नामदेव गडमड (दोघेही रा. कळहाळी, ता. कंधार) आणि कविता बजरंग वानरखेडे (रा. मनाठा) यांनी संगनमत करून फिर्यादीस खोटे बोलून त्यांच्या नावावर असलेली ४.५ गुंठे जमीन खरेदी करून पैसे न देता फिर्यादीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिला फिर्यादी सुजळाबाई मोहनबुवा गिरी, वय ७० वर्षे, रा. कळहाळी, ता. कंधार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि/मगर करीत असून, पोलीस तपास सुरू आहे.
कंधारमध्ये ४.५ गुंठे जमिनीच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
कंधार (प्रतिनिधी) – रजिस्ट्री ऑफिस, कंधार येथे २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ४.५ गुंठे जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
