अर्धापूर (प्रतिनिधी)- येळेगाव येथे पोलिसांच्या तपासात दबाव आणण्याचा प्रयत्न करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४० वाजता येळेगाव, ता. अर्धापूर येथे शिवाजी रामदास जाधव व रामदास जाधव (दोघे रा. येळेगाव) यांनी संगनमत करून फिर्यादीने दाखल केलेल्या पोस्टे परळी गुन्हा क्रमांक ३३५/२०२६ मधील आरोपी शिवाजी रामदास जाधव याच्या गुन्ह्याच्या तपासात दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी फिर्यादी सपोनि राधानंद तुळशीदास मेंडके, नेम पोस्टे परळी ग्रामीण, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १३२, ३५२, १२५, १२६(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि कांबळे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 806 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुदखेडमध्ये भरदिवसा घरफोडी; ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास प्रेमप्रकरणाच्या रागातून खून; मुखेड पोलिसांची पाच तासांत तिघांना अटक