किनवटमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ३.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

किनवट (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी, किनवट यांच्या विशेष पथकाने मौजे कुपटी (खु.), ता. किनवट येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी व चारचाकी वाहनांसह एकूण ₹३,८२,८०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुगार खेळताना आढळलेल्या आरोपींमध्ये विठ्ठल देशमुखे, महादू कोल्हे, माधव सिताराम कराळे, दिगंबर गणपत वानोळे, सूर्यभान मारुती देशमुखे, कृष्णा रामदास फोले, प्रदीप आनंदाराव फोले, आनंदाराव दुडुळे, यशवंत नरसिंग बोंदगीर आणि दीपक देवराव भुसारे यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी कुपटी (खु.), ता. किनवट येथील रहिवासी असल्याचे पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये नमूद आहे.

 

कारवाईदरम्यान ₹४७,००० रोख रक्कम, सहा मोबाईल फोन, तीन मोटारसायकली, एक चारचाकी वाहन तसेच जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹३,८२,८०० असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

 

या प्रकरणी इस्लापूर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. १०१४/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इस्लापूर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केली. पोलीस उपनिरीक्षक फडेवार तसेच पोलीस अंमलदार गजानन चव्हाण आणि गजानन वेरूळकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.

नांदेड जिल्हा पोलिसांकडून अवैध जुगार, मटका व इतर बेकायदेशीर प्रकारांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत असून, अशा प्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!