शासकीय कर्मचारी असो की सामान्य नागरिक… आता कार्यालयातील जुने अभिलेख (Records) प्रत्यक्ष हाताळण्याची किंवा शोधण्याची अजिबात गरज नाही!
महाराष्ट्र शासनाने डिजिटल क्रांती करत आपल्या तहसील कार्यालयातील सर्व जुने ऐतिहासिक दस्तावेज पूर्णपणे स्कॅन करून ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. आता मूळ कागदपत्रे पाहण्यासाठी सरकारी कार्यालयात जाऊन ‘पाय झिजवायची’ काहीच आवश्यकता नाही! 


सन १९६० ते २०१५/२०१६ पर्यंतचे
जुने ७/१२ (Satbara)
फेरफार / हक्क नोंदणी पत्रक
पाहणी पत्रक व खासरा पत्रक
‘क’ पत्रक (K-Prat)
City Survey Office आणि Deputy SLR Office चे महत्वपूर्ण अभिलेख
खास वैशिष्ट्ये:
घरी बसून सेवा: डिजिटल पद्धतीने सर्व स्कॅन केलेले अस्सल दस्तावेज मोबाईल किंवा संगणकावर उपलब्ध.
पूर्णपणे मोफत: हे सर्व जुने अभिलेख पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही!
सुरक्षित लॉगिन: पासवर्ड किंवा थेट मोबाईल OTP द्वारे सुरक्षित प्रवेश.
करायचं काय?
अगदी सोपी पद्धत:नोंदणी करा: सर्वात आधी खाली दिलेल्या अधिकृत लिंकवर जा आणि sign up करून तुमचे मोफत खाते (Account) तयार करा.
लॉगिन करा: तुमचा Login ID आणि Password वापरून किंवा मोबाईलवर OTP द्वारे या दोन सोप्या पद्धतींनी लॉगिन करा.
माहिती भरा: लॉगिन केल्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि कार्यालय निवडा.
शोध घ्या: तुम्हाला हवा असलेला दस्तावेज निवडून समोरील रकान्यात तुमचा गट नंबर / सर्वे नंबर किंवा फेरफार नंबर टाका आणि ‘Search’ वर क्लिक करा.
डाउनलोड करा: तुमचा मूळ अभिलेख त्वरित समोर दिसेल, जो तुम्ही सहज डाउनलोड करू शकता!
आजच भेट द्या आणि आपला वेळ वाचवा:
अधिकृत वेबसाईट लिंक: https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords
माहिती महत्त्वाची आहे! आपल्या शेतकरी बांधवांना आणि मित्रांना नक्की शेअर करा
