नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे मंगळवार, दि. 28 जुलै 2026 रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी नांदेड दौऱ्यावर येणार आहेत.
यावेळी दुपारी 3.00 ते 5.00 या वेळेत ते पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या व तक्रारी जाणून घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या अडचणी, तक्रारी किंवा सूचना मांडण्यासाठी संबंधित वेळेत पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय, नांदेड परिक्षेत्रामार्फत करण्यात आले आहे.
