लोहा (प्रतिनिधी) – तालुक्यातील काबेगाव येथील मूळ रहिवासी असलेले जोंधळे कुटुंब काही वर्षांपूर्वी लोहा येथे स्थायिक झाले. या कुटुंबातील मिथुन तातेराव जोंधळे हे पश्चिम आफ्रिकेतील घाना सिटी येथे नोकरी निमित्त वास्तव्यास होते. तेथेच त्यांचे दि. ३ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर लो’ात २० दिवसानंतर म्हणजे दि. २४ जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. मिथून यांनी औरंगाबाद, पुणे येथे व्यवसाय केल्यानंतर सन २०२३ मध्ये पश्चिम आफ्रिकेतील घाना सिटी येथील जे.के.कंपनीत उत्पादन व्यवस्थापक पदावर नोकरीची संधी त्यांना मिळाली. त्यांनी दोन वर्षाच्या करारावर सदर नोकरी पत्करली होती. दीड वर्षे त्यांनी त्या कंपनीमध्ये नोकरी केली. दरम्यान त्यांना तिकडेच मेंदू विकार झाल्यामुळे त्यांच्यावर जे.के.कंपनीने वैद्यकीय उपचार सुरु केले. मात्र उपचारादरम्यान मिथुन जोंधळे (३९) यांचे घाना सिटी येथील रुग्णालयात दि. ४ जुलै २६ रोजी निधन झाले.त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आठवले यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण मोरे, केंद्रीय सचिव पृथ्वीराज भट्टी,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने सहकार्य केले.दि. २४ जुलै रोजी लोहा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडिल,भाऊ, बहीण, भावजय, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.रिपाई (आठवले) गटाचेे मराठवाडा सरचिटणीस तथा पत्रकार बालाजी धनसरे यांचे ते जावई होत. काबेगावचे पोलिस पाटील भीमराव जोंधळे यांचे ते धाकटे बंधू होत. अंत्यविधीस सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, व्यापारी क्षेत्रातील अनेक जण उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 765 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या पाच घटना; साडेतीन लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास कुंटूर येथे घरफोडी; साडे दोन लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास