प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन नांदेड – सन 2025-26 या वर्षासाठी कल्याणकारी निधीतून विशेष गौरव पुरस्कार पुढे नमूद केलेल्या विविध क्षेत्रातील कामगिरी नुसार प्रदान केली जाणार आहेत. नमूद क्षेत्रात विशेष गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव, अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रे व शिफारशीसह सोमवार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे जमा करण्यात यावीत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार करता येणार नाही कारण विहित अर्ज ठराविक दिनांकापर्यंत संचालक सैनिक कल्याण विभाग पुणे यांना सादर करणे अनिवार्य आहेत. इयत्ता १० वी बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्के व १२ वी बोर्डाच्या परीक्षेत ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/राज्य स्तर पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू. साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इ. क्षेत्रातील राष्ट्रीय/राज्यस्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्ती. नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्यांना केंद्र/राज्य शासन पुरस्कृत व्यक्ती. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी (विद्यापीठात प्रथम/IIT,IIM,AIIMS मध्ये प्रवेश प्राप्त). सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक राज्य स्तरावर पुरस्कार मिळविणारे व्यक्ती. अधिक माहितीसाठी कल्याण संघटक व लिपिक (मोबाईल नंबर 8999638872/ 8707608283) यांच्याशी संपर्क करावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. Kanthak Suryatal Post Views: 305 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रात्री १० वाजता जंतर-मंतरवर काय घडलं? मोडलेले मंच आणि फाटलेले तंबू पुन्हा उभे, तरुणाईचा एल्गार! सिंहासन खाली करो, जनता आती है! : संसदेत खर्गेंचा Gen Z अवतार, मोदी सरकारला थेट इशारा!