नांदेड (प्रतिनिधी) – शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आपल्या दोन मुलांसह नदीत कार पाडून आत्महत्या केल्याची घटना सुरुवातीला समोर आली होती, परंतु या प्रकरणातील सत्य अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक आहे. शवविच्छेदन अहवालातून असे स्पष्ट झाले आहे की, ही केवळ आत्महत्या नसून त्यापूर्वी झालेल्या दोन निर्घृण हत्या आहे. या घटनेने संपूर्ण समाजात खळबळ माजली असून, मानवी मानसिकतेवर आणि ढासळत्या सामाजिक धैर्यावर आता गंभीर चिंतनाची गरज निर्माण झाली आहे. काय आहे धक्कादायक वास्तव? प्राथमिक माहितीनुसार असे वाटले होते की मोरे यांनी मुलांसह जलसमाधी घेतली, मात्र पोस्टमार्टम अहवालानुसार, नदीत पडण्यापूर्वीच सारा (८) आणि सुमित (१२) या दोन निष्पाप बालकांच्या गळ्यावर शस्त्राने वार करण्यात आले होते . याचा अर्थ असा की, सुनील मोरे यांनी आधी आपल्या दोन्ही मुलांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःची गाडी पुलावरून नदीत पाडून आत्महत्या केली. या घटनेच्या भीषणतेमुळे आता भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ नुसार (हत्येचा गुन्हा) सुनील मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सामाजिक वैफल्याचे प्रतिबिंब? सुनील मोरे यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या स्टेटसवर काही लोकांची नावे लिहिली होती, ज्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले, त्या लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. परंतु, आपल्या पोटच्या गोळ्यांचा जीव घेण्यामागे नेमकी काय मानसिकता असावी, याचा समाजाने विचार करणे गरजेचे आहे. माझ्या पश्चात माझ्या लेकरांची देखभाल कोण करेल? या भीतीने किंवा टोकाच्या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. जागृतीची आणि बदलाची गरज: ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून ती समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे. जीवनात येणाऱ्या संकटांना न घाबरता, विपरित परिस्थितीतही धैर्याने मार्ग काढणे आवश्यक असते. जीवनातील आडव्या तिडव्या वाटांवर चालताना आपणच योग्य वळणे घ्यावी लागतात, हा विचार समाजात रुजणे गरजेचे आहे. अशा टोकाच्या घटना रोखण्यासाठी: मानसिक तणावाखाली असलेल्या व्यक्तींना वेळीच आधार मिळणे आवश्यक आहे. कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर संवाद वाढवण्याची गरज आहे. संकटात सापडलेल्या व्यक्तीने टोकाचे पाऊल न उचलता कायद्याची आणि समाजाची मदत घ्यावी, यासाठी जनजागृती होणे काळाची गरज आहे. सुनील मोरे प्रकरणाने समाजासमोर अनेक प्रश्न उभे केले आहेत. जर आपण आताच सावध होऊन अशा प्रवृत्तींविरुद्ध आणि मानसिकतेविरुद्ध एकत्र आलो नाही, तर अशा घटनांची पुनरावृत्ती टाळणे कठीण होईल. ही वेळ केवळ हळहळ व्यक्त करण्याची नसून, समाजाने एकत्रितपणे विचार करण्याची आणि एकमेकांना आधार देणारी व्यवस्था निर्माण करण्याची आहे. संबंधित बातमी .. सुनील मोरेंची ती शेवटची स्टेटस अपडेट आणि प्रशासनाचा क्रूर चेहरा; महाराष्ट्र सुन्न! Kanthak Suryatal Post Views: 2,626 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ग्रामीण मातीतून घडलेला कर्तबगार अधिकारी; पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्यावर वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची महत्त्वाची जबाबदारी असर्जन मधील आजीच्या खुनाचा गुन्हेगार नातू
“सोशल मीडियावर या शिक्षकाबद्दल असं म्हटलं जात आहे की हा आदर्श शिक्षक होता, आता लोकांनी या आदर्श शिक्षकाकडून कोणता आदर्श घेतला पाहिजे?” 😡😡😡 Reply
सर, ही बातमी व वाचून मन खूप हेलावून गेले आहे. पण जर या मुलांची धारदार शस्त्राने हत्या केली या मध्ये काही तथ्य नसेल तर पत्रकारांनी आत्मपरीक्षना ची गरज आहे. Reply