गुरुद्वारा बोर्डाच्या महिला कर्मचाऱ्याची बदनामी; १५ लाखांच्या नुकसान भरपाईची नोटीस

नांदेड (प्रतिनिधी)- सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या कर्मचारी बबीता कौर जितेंद्र सिंघ चाहल यांनी आपली बदनामी केल्याप्रकरणी दीपक सिंघ रतन सिंघ गल्लीवाले यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसद्वारे १५ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची आणि जाहीर माफीची मागणी करण्यात आली आहे.

देण्यात आलेल्या माहितीनुसार, २५ जून २०२० रोजी दीपक सिंघ गल्लीवाले यांनी बबीता कौर यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. यामध्ये बबीता कौर यांनी बोर्डाच्या जागांवर चुकीच्या पद्धतीने ताबा मिळवला असून, या जागा अत्यंत अल्प दराने भाड्याने घेतल्याचे आरोप करण्यात आले होते. हे आरोप सोशल मीडिया ग्रुपवर देखील प्रसारित करण्यात आले होते, ज्यामुळे आपली प्रतिमा मलीन झाल्याचा दावा बबीता कौर यांनी केला आहे.

या कायदेशीर नोटीसमध्ये एका घराचाही उल्लेख करण्यात आला आहे. हे घर पूर्वी दुसऱ्या एका व्यक्तीच्या ताब्यात होते आणि नंतर ते जितेंद्र सिंघ  चाहल यांना देण्यात आले होते. या घराच्या संदर्भात आणि गुरुद्वारा बोर्डाच्या कारभाराबाबत बबीता कौर यांच्यावर करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

बबीता कौर यांच्या वतीने ॲडव्होकेट आर.पी. मठवाले  यांनी ही नोटीस पाठवली आहे. संबंधित व्यक्तीने याप्रकरणी जाहीर क्षमा मागावी किंवा १५ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असा इशारा या नोटीसद्वारे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!