नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील विविध फौजदारी प्रकरणांमध्ये न्यायालयीन सुनावणी सुरू असतानाही हजर न राहिलेल्या फरार आरोपींविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 356 अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुख्य न्याय दंडाधिकारी, नांदेड यांच्या आदेशानुसार वजीराबाद पोलीस ठाण्यातील तीन प्रकरणांतील फरार आरोपींबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने संबंधित आरोपी तसेच त्यांच्या नातेवाईकांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आवाहन केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींची माहिती वर्तमानपत्रांद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून, त्यांना न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्यात येत आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नियमित फौजदारी खटला क्रमांक 686/2010 मधील मोहम्मद मुस्तफा कुरेशी व मोहम्मद आरिफ, खटला क्रमांक 469/2009 मधील गोविंद रामलाल जोशी तसेच खटला क्रमांक 3157/1997 मधील नवाबखान गुलाबखान यांचा समावेश आहे. हे आरोपी अद्याप न्यायालयासमोर हजर झालेले नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित फरार आरोपींबाबत कोणतीही माहिती असल्यास ती तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून द्यावी. न्यायालयीन आदेशांची प्रभावी अंमलबजावणी आणि फरार आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. Post Views: 1,005 Facebook WhatsApp Twitter LinkedIn Post navigation डोनाल्ड ट्रम्प यांचा २४ सेकंदांचा व्हिडिओ: भारतीय शेअर बाजारात एका झटक्यात गुंतवणूकदारांचे सुमारे ७ ते ८ लाख कोटी रुपये स्वाहा महाराष्ट्रात ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या