राज्यात खरीप हंगाम सन 2025 मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानुसार खरीप हंगाम सन 2025 जिल्हास्तरावर पिकस्पर्धा निकाल जाहीर झाला, त्यामध्ये सोयाबीन पिकामध्ये शेख अजीम शेख खाजामोईनोद्दीन, (उत्पादन 40.24 क्विं./ हे.) रा.निचपूर ता.किनवट, पिराजी बाबाराव अरसुळे, (उत्पादन 34.33 क्विं./हे.) रा.एकदरा, ता. नांदेड, ज्ञानेश्वर पूरभाजी आढाव, (उत्पादन 33.33 क्विं./हे.) हदीदापूर ता. नांदेड हे शेतकरी सर्वसाधारण गटामध्ये सोयाबीन या पिकामध्ये क्रमशः प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
तसेच युवराज प्रकाश तोडसाम (उत्पादन 24.00 क्विं./हे.) रा.गोंडवडसा ता. माहुर हे आदिवासी गटामध्ये सोयाबीन या पिकामध्ये प्रथम आले आहेत. मुग पिकामध्ये गोविंद मारोती होळगे (उत्पादन 10.50 क्विं./हे.) व उडीद पिकामध्ये विश्वनाथ गोविंदराव होळगे (उत्पादन 7.00 क्विं./हे.) रा.दापसेड ता.लोहा हे प्रथम आले आहेत. भोकर तालुक्यातून मका या पिकामध्ये अनुक्रमे बाबय्या संतोबा कोरडेवाड (उत्पादन 35.00 क्विं./हे.) व प्रणीतरेड्डी नरसिंहरेड्डी मूल्यलवाड (उत्पादन 35.00 क्विं./हे.) रा. किनी हे प्रथम व द्वितीय आले तर तुर या पिकात धर्माबाद तालुक्यातुन दिगंबर शंकर कपाटे (उत्पादन 43.81 क्विं./हे.) व हणमंतराव मारोती वारले (उत्पादन 41.58 क्विं./हे.) हे अनुक्रमे प्रथम व द्वितीय आले आहेत. पिक्स्पर्धेत विजेते शेतकऱ्यांना जिल्हास्तरावर क्रमशः प्रथम,द्वितीय व तृतीय यांना 10 हजार , 7 हजार व 5 हजार रुपये बक्षीस रक्कम मिळणार आहेत.
सर्व विजेत्या शेतकऱ्यांचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व खरीप हंगाम सन 2026 पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना केले आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ – www.krishi.maharashtra.gov.in किंवा सबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
