मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने २६ जून २०२६ रोजी राज्य पोलीस सेवेतील २७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश निर्गमित केले आहेत. पोलीस आस्थापना मंडळ क्र. १ च्या शिफारशींनुसार आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार हे फेरबदल करण्यात आले आहेत.
नांदेड येतील चंद्रशेखर कदम आणि जगदीश भंडरवार यांना सुद्धा मागच्या बदल्यात दिलेल्या पदस्थापना बदलून त्यांना नांदेड जिल्ह्यात किनवट आणि भोकर उप विभागात नियुती देण्यात आलेली आहे. काही जणांना बदली थांबवून प्रतीक्षेत राखून ठवण्यात आले आहे.तर काही जणांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.झालेल्या सर्व २७ अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांची जुनी व नवीन पदस्थापना खालीलप्रमाणे आहे:
१. मयांक माधव: उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO), तुमसर, भंडारा येथून SDPO, उमरेड, नागपूर ग्रामीण येथे बदली. २. सुधीर पुंडलिक नंदनवार: SDPO, राजुरा, चंद्रपूर (बदली आदेशाधीन: उमरेड) येथून SDPO, बुलढाणा येथे बदली. ३. रामकृष्ण नारायण पवार: बुलढाणा येथून पदोन्नतीने SDPO, वाशिम म्हणून नियुक्ती. ४. विपुल विजय पाटील: SDPO, विटा, सांगली (बदली आदेशाधीन: बुलढाणा) येथून SDPO, सातारा येथे बदली. ५. अविनाश शंकर शिळीमकर: पुणे ग्रामीण येथून पदोन्नतीने पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय), पुणे ग्रामीण पदी नियुक्ती. ६. प्रदीप शिवाजी काळे: बृहन्मुंबई येथून पदोन्नतीने पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, रत्नागिरी येथे नियुक्ती. ७. विशाल कृष्णा खांबे: SDPO, फलटण, सातारा येथून नियुक्तीच्या प्रतीक्षेत. ८. सुवर्णा उमेश शिंदे (सुवर्णा उमेश ढवळे): बृहन्मुंबई येथून पदोन्नतीने सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर येथे नियुक्ती. ९. दगडू सय्यप्पा हाके: SDPO, भोकर, नांदेड येथून पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF), छत्रपती संभाजीनगर येथे बदली. १०. जगदीश राजना भंडारवार: दहशतवाद विरोधी पथक (ATS) येथून पदोन्नतीने SDPO, भोकर, नांदेड येथे नियुक्ती. ११. चंद्रशेखर आनंद कदम: नांदेड येथून पदोन्नतीने SDPO, किनवट, नांदेड येथे नियुक्ती. १२. ज्योतिका श्रीकृष्ण इंगळे: ATS येथून पदोन्नतीने SDPO, पवनी, भंडारा येथे नियुक्ती. १३. रमेश सुदाम बरकते: SDPO, रामटेक (बदली आदेशाधीन: पवनी) यांना SDPO, रामटेक येथेच १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. १४. ममता लॉरेन्स डिसुजा: सहायक पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरार येथून सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर येथे बदली. १५. सोहन कनयान माछरे: सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर येथून SDPO, मलकापूर, बुलढाणा येथे बदली. १६. उमेश नागोराव पाटील: SDPO, अंजनगाव सुर्जी, अमरावती ग्रामीण येथून SDPO, मोर्शी, अमरावती ग्रामीण येथे बदली. १७. सुनील पांडुरंगपंत हुड: SDPO, मोर्शी, अमरावती ग्रामीण येथून SDPO, अंजनगाव सुर्जी, अमरावती ग्रामीण येथे बदली. १८. नंदराज दिनकरराव पाटील: सहायक पोलीस आयुक्त, मुंबई रेल्वे येथून SDPO, मुक्ताईनगर, जळगाव येथे बदली. १९. प्रमोद सदाशिव वाघ: SDPO, मुक्ताईनगर, जळगाव येथून सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर येथे बदली. २०. संतोष बाबूराव गायकवाड: SDPO, कन्हाण, नागपूर ग्रामीण (बदली आदेशाधीन: पिंपरी चिंचवड) यांना SDPO, कन्हाण येथेच ३ महिन्यांची मुदतवाढ. २१. प्रमोद मयाराम मडामे: SDPO, कामठी, नागपूर ग्रामीण येथून SDPO, कुरखेडा, गडचिरोली येथे बदली. २२. गिरीश गणपत बने: SDPO, कुरखेडा, गडचिरोली येथून सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर येथे बदली. २३. संकेत नथुराम देवळेकर: परभणी शहर बदली आदेशाधीन असताना आता सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर येथे बदली. २४. अश्विनी गणेश राख: पुणे गुन्हे अन्वेषण विभाग (CID) बदली आदेशाधीन असताना आता जमाव व विसर्जन केंद्र, पुणे येथे नियुक्ती. २५. उत्तम तातोबा सूर्यवंशी: जमाव व विसर्जन केंद्र, पुणे येथून पोलीस उपअधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे येथे बदली. २६. अजय विलास कोकाटे: SDPO, अहेरी, गडचिरोली येथून SDPO, मिरज, सांगली येथे बदली. २७. संदेश तारसिंग नाईक: SDPO, सिरोंचा, गडचिरोली येथून सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई येथे बदली.
या आदेशानुसार पोलीस महासंचालकांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यमुक्तीबाबत आणि नियुक्तीबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे सर्व आदेश तातडीने अंमलात येतील.
