दारूसाठी पैशांची मागणी फेटाळल्याने मारहाण; १६ हजारांचा ऐवज हिसकावला

नांदेड, (प्रतिनिधी)- दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता न दिल्याच्या रागातून एका तरुणाने व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना १४ जून रोजी रात्री धनगाव परिसरात घडली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजताच्या सुमारास धनगाव येथील दारू अड्ड्याजवळ ही घटना घडली. आरोपी इरफान अन्वर (रा. नांदेड) याने फिर्यादी शेख जावेद शेख कासम (वय ३८, रा. अदनान गार्डन, धनगाव, ता. नांदेड) यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने फिर्यादीस मारहाण केली.

यानंतर आरोपीने फिर्यादीच्या शर्टच्या खिशातील ६ हजार रुपये रोख रक्कम तसेच सुमारे १० हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७४९/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 119(1) व 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ/१६२८ देवडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!