नांदेड (प्रतिनिधी) -नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसायविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून रोख रकमेसह ८ लाख ४८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १ ते ३१ मे २०२६ या कालावधीत नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या २२ व्या दिवशी पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप मार्गदर्शनाखालील पथकाने किनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळी शिवारात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या मोहिमेदरम्यान परिक्षेत्रात मटका-जुगार खेळणारे व चालविणारे अशा २९ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये ८ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून ९ लाख ५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या १९ जणांविरुद्ध १९ गुन्हे दाखल करून २८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध २ गुन्हे दाखल करून ५१ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गांजा विक्री करणाऱ्या दोघांविरुद्धही कारवाई करून २ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शस्त्र अधिनियमांतर्गत १, कोटपा कायद्यान्वये ४ आणि इतर कायद्यांअंतर्गत कारवाया करून एकूण ४२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व कारवायांमध्ये आरोपींकडून एकूण ६३ लाख ९२ हजार ४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली असून ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे माहिती देण्याचे आवाहन पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,068 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आता काही तासांमध्ये इराणवर अमेरिका हल्ला करणारच ? उकाड्यानंतर हवामानात बदल; नांदेड शहरात पावसाच्या सरी