नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ७२.०३ ग्रॅम ब्राऊन शुगर (चिट्टा) व एक स्कुटी असा एकूण ४ लाख ७० हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, अमृतसर (पंजाब) येथून काही जण नांदेडमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार २० मे रोजी नांदेड-हिंगोली गेट परिसरात सापळा रचून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता ७२.०३ ग्रॅम वजनाची ब्राऊन शुगर, एक स्कुटी आणि नोटा मोजण्याचे मशीन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये राजविंदर कौर जर्मनजितसिंग महाल (रा. अमृतसर, पंजाब), गुरमुखसिंग उर्फ गुरी सेवकसिंग गिल (रा. गुरुद्वारा गेट नं. ६, शाहिदपुरा, नांदेड), अमनप्रितसिंग उर्फ मनी जगजीतसिंग बेदी (रा. गुरुद्वारा गेट नं. २, नांदेड) आणि जगजीत उर्फ पटेल गोविंदराव सोनटक्के (रा. बाबानगरवाडी, ता. जि. नांदेड) यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ३ लाख ६० हजार १५० रुपयांची ब्राऊन शुगर, १ लाख १० हजार रुपयांची स्कुटी तसेच नोटा मोजण्याचे मशीन यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वजीराबाद पोलीस करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,309 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation क्राईम बीटचे हुजरे : पत्रकारितेचा नवा डिजीटल अवतार! नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना का म्हणाले राहुल गांधी गद्दार