मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत महत्त्वाचा शासन आदेश जारी केला आहे. १६ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या आदेशानुसार भारतीय पोलीस सेवा (IPS) व राज्य पोलीस सेवेतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस आस्थापना मंडळ क्र. १ यांच्या शिफारशींनुसार आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या नव्या पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश लवकरच काढण्यात येणार आहेत. बदली झालेल्या प्रमुख अधिकाऱ्यांची नावे शारदा राऊत — विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक विनीता साहू — अपर पोलीस आयुक्त (सशस्त्र पोलीस), मुंबई शीला साईल — पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई प्रकाश जाधव — सहायक पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक कार्यालय विवेक पाटील — पोलीस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड दत्तात्रय कांबळे — पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई अशोक बनकर — प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना महासंचालकांना कार्यवाहीचे निर्देश महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना न्यायालयीन आदेश, निवडणूक आचारसंहिता तसेच राज्यातील कायदा-सुव्यवस्था लक्षात घेऊन आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकृत संकेतस्थळावर आदेश उपलब्ध सदर शासन आदेश राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध करण्यात आला असून राज्यपालांच्या आदेशानुसार गृह विभागाने तो प्रसिद्ध केला आहे Kanthak Suryatal Post Views: 1,137 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शाहंच्या लाडक्या उपमंत्र्याचा मवाल्या पुत्र आणि राहुल गांधींचा कडक प्रहार: जेव्हा सत्तेचा माज दिल्लीतून गल्लीत चक्काचूर होतो! पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाकडून कुंटूर येथे गुटखा जप्त