माविकसंच्या परिमंडळ अध्यक्षपदी शंकर घुले तर सचिवपदी रामेश्वर कौठेकर

नांदेड-मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या नांदेड परिमंडळ अध्यक्षपदी शंकर घुले तर सचिवपदी रामेश्वर कौठेकर यांची निवड करण्यात आली आहे.
मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ.संजय घोडके यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या सदस्यांची महत्वपूर्ण बैठक सहयोगनगर येथील बौद्ध विहाराच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संघटनेच्या नांदेड परिमंडळ अध्यक्षपदी शंकर घुले यांची फेरनिवड करण्यात आली असून तसेच कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
रामेश्वर कौठेकर (सचिव), अविनाश खंदारे, विनय शहाणे (उपाध्यक्ष), भीमराव सोनकांबळे, संदेश खंदारे, सिद्धार्थ पिंपरे (सहसचिव), एस.एम.कांबळे, वैभव सोनसळे (संघटक), सिद्धार्थ पाटील, प्रमोद बुक्कावार, राजकुमार सिंदगीकर (मुख्य सल्लागार), विनोद बिंगेवार, राजेश भागवत (प्रसिद्धी प्रमुख), रेखा लोणे, पल्लवी कदम, संघविना ढवळे (महिला प्रतिनिधी), आर.डी. पवार, धम्मपाल वाकळे, राजीव कांबळे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या बैठकीला केंद्रीय उपाध्यक्ष विनायकराव ढवळे, सिध्दार्थ पाटील, अभयराज कदम, सिद्धार्थ कांबळे, निझान तिमके, सचिन शिंदे, सोहेल खान, दशरथ पवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!