पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गु.र.नं. 507/2026 कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 5 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास लिंबरा हिल्स कॉलनी, नांदेड येथे करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून आरोपींना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. आरोपींकडून 52 पत्त्यांचे बंडल, रोख रक्कम 5,300 रुपये, एक मोटारसायकल, पाच मोबाईल फोन असा एकूण 1,42,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
1. शेख शौकत शेख बाबर (वय 60, रा. मेहनदिया कॉलनी, नांदेड)
२. शेख बरकत शेख बशीर (वय 43, रा. उपर कॉलनी, नांदेड)
3. मोहम्मद सुब्हान मोहम्मद खान (वय 55, रा. हकीमिया कॉलनी, नांदेड)
4. शेख अनवर शेख छोटेमियाँ (वय 52, रा. हबीबिया कॉलनी, नांदेड)
5. शेख जाहीद शेख नजीर (वय 43, रा. हिलालनगर, नांदेड)
