नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन ‘क्रॅक डाउन’ अंतर्गत जुगार अड्ड्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण 1,42,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गु.र.नं. 507/2026 कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 5 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास लिंबरा हिल्स कॉलनी, नांदेड येथे करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून आरोपींना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. आरोपींकडून 52 पत्त्यांचे बंडल, रोख रक्कम 5,300 रुपये, एक मोटारसायकल, पाच मोबाईल फोन असा एकूण 1,42,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: 1. शेख शौकत शेख बाबर (वय 60, रा. मेहनदिया कॉलनी, नांदेड) २. शेख बरकत शेख बशीर (वय 43, रा. उपर कॉलनी, नांदेड) 3. मोहम्मद सुब्हान मोहम्मद खान (वय 55, रा. हकीमिया कॉलनी, नांदेड) 4. शेख अनवर शेख छोटेमियाँ (वय 52, रा. हबीबिया कॉलनी, नांदेड) 5. शेख जाहीद शेख नजीर (वय 43, रा. हिलालनगर, नांदेड) इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, उपनिरीक्षक चंद्रकांत कुसमे, पोलीस अंमलदार वसंत केंद्रे,विनोद पवार,मारोती पंचलिंग,शंकर माळगे.समीर अहेमद,सचिन चावरे,धम्मपाल कांबळे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली. सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. संबंधित व्हिडिओ …. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/05/WhatsApp-Video-2026-05-06-at-11.54.58.mp4 Kanthak Suryatal Post Views: 729 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ममता की ललकार: संवैधानिक संकट और पश्चिम बंगाल में सत्ता का संघर्ष एप्रिल महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांतच लोकांनी बँकांमधून तब्बल ६१० अब्ज