नांदेड,(जिमाका)- डाक विमा ही सरकारी विमा योजना असून सर्व सामान्यांना कमी हफ्त्यात अधिक बोनस देणारी कल्याणकारी विमा योजना आहे. सर्व सामान्यांना त्यांच्या कुटूंबाच्या सुरक्षिततेच्या हमीसाठी डाक जीवन विमा घेण्याचे आवाहन अधीक्षक राजीव पालेकर यांनी केले. नांदेड येथील मयत रोहीत राजेश्वर बच्चेवार विक्रीकर निरीक्षक नांदेड यांनी भारतीय डाक विभागाची दहा लाख रुपयाची डाक जीवन विमा संतोष पॉलीसी तीन वर्षांपूर्वी घेतली होती. जानेवारी 2024 मध्ये त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांनी डाक जीवन विमा पॉलीसी घेतल्यामुळे त्यांना डाक विभागाचे अधीक्षक राजीव पालेकर यांच्या हस्ते 12 लाख 14 हजार रुपयाचा धनादेश वारसाची पत्नी श्रीमती रागिणी कमठाणे यांना 11 मार्च 2024 रोजी सुपूर्द करण्यात आला. Kanthak Suryatal Post Views: 2,126 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्हा रेशीम कार्यालयास जागा भाडे तत्वावर देण्यासाठी इमारत मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन ‘मतदानाची टक्केवारीत वाढ आणि नवतरुणांचे मतदान ‘रील तयार करा ! शॉर्ट फिल्म तयार करा ! बक्षिसे जिंका !