अर्धापूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील दुर्गानगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री १२.०० ते सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. दुर्गानगर, अर्धापूर येथील फिर्यादी सोमनाथ दामोदर शिनगारे (वय २८) यांच्या घराच्या दरवाज्याची कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे १ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५५/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(४), ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 659 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड परिक्षेत्रात शहाजी उमाप यांच्या देखरेखीत गुटखा विरोधी मोहिमेला वेग रामतीर्थ पोलिसांची जलद कारवाई; विनयभंग प्रकरणात 12 तासांत दोषारोपपत्र दाखल