अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे अज्ञात ड्रोनच्या थव्यांनी आकाशात उड्डाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, आणि त्यामुळे संपूर्ण अमेरिकन सुरक्षा यंत्रणा अक्षरशः हादरून गेली आहे. संरक्षण यंत्रणेत खळबळ उडाली असून, पेंटागॉन मधील उच्चपदस्थ अधिकारी सतर्क झाले आहेत. ही घटना इतकी गंभीर मानली जात आहे की, वरिष्ठ नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाची बातमी सर्वप्रथम द वॉशिंग्टन पोस्टने प्रसिद्ध केली, आणि त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य अधिकच अधोरेखित झाले. व्हाइट हाऊसपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या लष्करी तळांवर हे ड्रोन दिसले ही बाबच अमेरिकेच्या सुरक्षेतील मोठी पोकळी उघड करते. जगातील सर्वात शक्तिशाली देश मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या हद्दीत असे ड्रोन शिरले, चक्कर मारून परत गेले, आणि त्यांना रोखण्यात किंवा इंटरसेप्ट करण्यातही अपयश आले ही बाब अत्यंत लाजिरवाणी आणि चिंताजनक मानली जात आहे. या घटनेनंतर चार्ली अलर्ट जाहीर करण्यात आला आहे जो संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या उच्च शक्यतेचा इशारा मानला जातो. संपूर्ण अमेरिकन सैन्याला हाय-अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही, या ड्रोनचे मूळ नेमके कुठे आहे, ते कोणाच्या नियंत्रणाखाली होते, याचा अद्याप कोणताही ठोस मागोवा लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर इराण चा संशय व्यक्त केला जात आहे, पण तांत्रिकदृष्ट्या इराणमधून थेट अमेरिकेच्या राजधानीपर्यंत ड्रोन पोहोचणे कठीण मानले जाते. त्यामुळे हे ड्रोन स्थानिक पातळीवरून किंवा तिसऱ्या देशाच्या मदतीने उड्डाण केले असावेत, अशी शक्यता अधिक बळावत आहे. यामुळे अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना अधिकाऱ्यांनी मौन बाळगणे पसंत केले आहे. वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांचे अचूक ठिकाण सुद्धा उघड करण्यात आलेले नाही यावरून परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. व्हाईट हाऊस मध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली असून, हवाई सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमता सध्या प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही घटना एक गोष्ट ठळकपणे दाखवते जगाला शस्त्रे पुरवणाऱ्या आणि स्वतःला सर्वात सुरक्षित समजणाऱ्या अमेरिकेच्या घरातच अज्ञात ड्रोन मुक्तपणे फिरतात, आणि त्यांना थांबवण्यात यंत्रणा अपयशी ठरते. डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार मिरवलेली जगातील सर्वात ताकदवान आणि अत्याधुनिक सैन्य ही प्रतिमा या घटनेमुळे हादरली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. Kanthak Suryatal Post Views: 647 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड रेल्वे पोलिसांच्या ताब्यातून दोन आरोपी बेड्यासह फरार; सीसीटीव्ही असूनही गुप्ततेचा पडदा नांदेड परिक्षेत्रात शहाजी उमाप यांच्या देखरेखीत गुटखा विरोधी मोहिमेला वेग