पोलीस अमलदाराला अटक करू नये काय ? न्यायालयाचा सवाल कंधार (प्रतिनिधी)- ६० लाख रुपयांच्या फसवणूक आणि मारहाणीच्या गंभीर प्रकरणात आरोपीने दाखल केलेला जामीन अर्ज कंधार येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एन.पाटील यांनी फेटाळून लावला आहे. या प्रकरणातील आरोपी नांदेड जिल्ह्यात नामवंत आणि यशवंत पोलीस अंमलदार राजेश बाबुराव मुंडे हे आहे. प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी हा उमरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असून आरोपी हा त्याच्या वडिलांचा नातेवाईक आणि मित्र आहे. आरोपीपोलीस अंमलदार राजेश बाबुराव मुंडे फिर्यादीला ‘गुप्त खजिना’ सापडल्याचे सांगून अर्ध्या किमतीत सोने देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी ६० लाख रुपये आणण्यास सांगितले. फिर्यादीने नातेवाईकांकडून रक्कम जमा करून ती आरोपीकडे दिली. मात्र ना सोने दिले, ना पैसे परत केले, अशी तक्रार आहे. त्यानंतरच्या पुरवणी जबाबात फिर्यादीने वेगळी माहिती देत आरोपीने बनावट नोटा देण्याचे सांगितल्याचा आरोप केला. तसेच आरोपीच्या साथीदारांनी पोलिसांच्या वर्दीत येऊन मारहाण करून रक्कम लंपास केल्याचेही नमूद केले आहे. या प्रकरणात संबंधित आरोपी हा पोलीस राजेश मुंढे कर्मचारी असल्याचे सांगितले जाते. त्याच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना फिर्यादीच्या जबाबात विसंगती असल्याचे सांगितले. तसेच आरोपीचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला.मात्र सरकारी पक्षाने आरोपीसह इतर पोलिसांच्या सहभागाची शक्यता व्यक्त करत सखोल चौकशीसाठी कोठडीची गरज असल्याचे सांगितले. न्यायालयानेही आरोप गंभीर असल्याचे नमूद करत तपासासाठी आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवले. यावरून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावण्याचा आदेश दिला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,859 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्ष सक्तमजुरी आणि २१ हजार रोख दंड सगरोळी वाळू घाटावर पोलिसांची धडक कारवाई; २४ तास उलटूनही महसूल-आरटीओ गायब!