नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील भाग्यनगर परिसरात तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना तात्काळ अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले दोन तलवारी व तीन मोटारसायकली असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 139/2026 अन्वये भा.दं.वि. कलम 109(1), 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2), 352 तसेच शस्त्र कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशाल ढगे यांना मारहाण झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास सिग्नल चौक, शिव रोड येथे जुन्या वादातून हा हल्ला घडला. आरोपींनी तलवारी व इतर हत्यारांनी हल्ला करून एका व्यक्तीस गंभीर जखमी केले. जखमी व्यक्तीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक रामेश्वर व्येंजने यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे,गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक महेश माळी,पोलीस उप निरीक्षक नरेश वाडेवाले,विनोद देशमुख, पोलीस अंमलदार गजानन किडे,विष्णुकांत मुंढे,राजीव घुले,राहुल लाठकर नागनाथ चापके,विशाल माळवे,अदनान पठाण,अंकुश कांबळे यांनी तातडीने कारवाई करत पाच आरोपींना अटक केली. तसेच एका विधीसंघर्षित बालकाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वैभव कोंके (वय 21), राहुल भुरारे (वय 29), योगेश भुरारे (वय 27), शुभम नायक (वय 24) आणि अनंत इंगळेदार (वय 19) आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक यांचा समावेश आहे.पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन तलवारी आणि तीन मोटारसायकली जप्त केल्या असून पुढील तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,880 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महादेव मंदिरातील दानपेटी फोडणारा चोरटा पकडला ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत RPF ची तत्पर कारवाई; परभणी रेल्वे स्थानकावर चोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडले