नांदेड(प्रतिनिधी)- डुकरे पकडण्याची मशीन न विचारता कशी घेवून गेला म्हणून एका व्यक्तीच्या खून करण्यात आला आहे. हा प्रकार कळगाव शिवार ता.उमरी येथे 8 मार्च ते 9 मार्चच्या रात्री घडला आहे. महेश आनंदा नंदगावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उमाकांत गोविंद नंदगावे याने यशवंत गंगाराम धतुरे यांची डुकरे पकडण्याची झटका मशीन न विचारता का घेवून गेला म्हणून 8 मार्चच्या रात्री 10 ते 9 मार्चच्या सकाळी 8 वाजेदरम्यान बालाजी यशवंत धतुरे(39), पुरूषोत्तम बाबु सरोदे (32), माधव यशवंत धतुरे(32), राहुल बाबु सरोदे(33), यशवंत गंगाराम धतुरे (62) या सर्वांनी मिळून कोणत्या तरी धार-धार शस्त्रांनी उमाकांत गोविंद नंदगावेवर वार करून त्याचा खून केला आहे. उमरी पोलीसांनी या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 143, 147, 148, 149, 323, 504 आणि 506 नुसार गुन्हा क्रमांक 103/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास उमरीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक माने हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 2,040 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दोन भावांनी मिळून महिलेसह अनेकांना घातला 13 लाखांचा गंडा पुरूषांशी ओळख वाढवून व्हिडीओ चित्रीकरणाच्या माध्यमातून खंडणी मागण्याचा नवीन प्रकार ; दोन महिला आणि तीन पुरूषांची टोळी