नांदेड – राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे शुक्रवार 13 मार्च 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार 13 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वा. परभणी येथून नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 11 ते 12 या कालावधीत हुजूर साहिब नांदेड गुरुद्वारा येथे समाधी दर्शन राखीव. दुपारी 12 ते 1 या कालावधीत सर्व स्थानिक सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी भेटीची राखीव वेळ व सर्कीट हाऊस. दुपारी 1 ते 2 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगांराच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे बाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी निवारण्यासाठी केलेल्या उपाययोजना संदर्भात आढावा बैठक व त्यानंतर पत्रकार परिषद होईल. दुपारी 2 ते 3 वा. भोजनासाठी राखीव. दुपारी 3 ते 4 वा. आयुक्त, महानगरपालिका, नांदेड यांच्यासमवेत नमस्ते योजनेची जिल्ह्यातील अंमलबजावणी तसेच उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल रिट याचिका क्र. 3950/202 व सिव्हिल अर्ज क्रमांक 15434/2023 मधील निर्देशानुसार करण्यात आलेली कार्यवाही लाड-पांगे समितीच्या शिफारशी प्रमाणे प्रलंबित प्रकरणे व त्याबाबत करण्यात आलेली कार्यवाही सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांचे निराकरण करणेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना याबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद. सायंकाळी 4 नंतर नांदेड येथून मुंबई कार्यालयाकडे प्रयाण करतील Kanthak Suryatal Post Views: 769 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पाणी, तेल आणि क्षेपणास्त्रांचे रणांगण! इराण-अमेरिका संघर्ष धोक्याच्या टप्प्यावर उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे शाळांच्या वेळेत बदल; सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंतच शाळा