नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 05 मार्च 2026 रोजी दुपारी ठीक 13:55 वाजता केशव नगर, हनुमानगड कमानीच्या मधोमध असलेल्या वृंदावन निवास या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक वर्षांचा शिवांश सतीश कंकरे हा निरागस बालक खेळत असताना अचानक रूमचा दरवाजा आतून लॉक झाला. घरातील मंडळींमध्ये क्षणभर घबराट पसरली. “संकट काळी धावून येणारा देवासमान” अशी म्हण आहे, त्याप्रमाणेच श्री. सतीश कंकरे यांनी तत्काळ अग्निशमन विभागाशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. सदर माहिती मिळताच अग्निशमन विभागाने क्षणाचाही विलंब न लावता रेस्क्यू वाहन अधिकारी व कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी रवाना केले. वेळेवर केलेली मदत म्हणजे अर्धे काम पूर्ण या उक्तीप्रमाणे अग्निशमन दलाने अत्यंत तत्परता, धाडस आणि कौशल्य दाखवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. घटनास्थळी पोहोचताच इमारतीच्या पाठीमागील बाजूस 35 फूट ॲल्युमिनियम एक्सटेन्शन लेडर लावून खिडकीमार्गे आत प्रवेश करण्याची योजना आखण्यात आली. फायर हुकच्या साहाय्याने आतून बंद झालेल्या दरवाजाची कडी काढण्यात आली. संपूर्ण कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी अत्यंत शिताफीने आणि संयमाने काम केले. “धीर धरा आणि मार्ग काढा” या तत्त्वाचा प्रत्यय त्यांच्या कार्यातून आला. लहानग्या शिवांशला सुखरूप बाहेर काढून त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. त्या क्षणी पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले; कारण देव तारी त्याला कोण मारी ही म्हण अक्षरशः खरी ठरली. अग्निशमन दलाच्या या प्रशंसनीय, धाडसी व मानवतावादी कार्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधानाचा श्वास घेतला. या रेस्क्यू मोहिमेत अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे, उप अग्निशमन अधिकारी निलेश कांबळे, उमेश ताटे, नरवाडे, मगरे, पठाण तसेच वाहन चालक एस. नरवाडे यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण व समर्पित सेवा बजावली. त्यांच्या या कार्याबद्दल मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.अग्निशमन दलाचे हे कार्य म्हणजे खऱ्या अर्थाने जनसेवा हीच ईश्वरसेवा याचे जिवंत उदाहरण होय. संबंधित व्हिडीओ …. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-05-at-15.52.57.mp4 Kanthak Suryatal Post Views: 868 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नवीन सेवार्थ प्रणाली ई-बील संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नांदेड ग्रामीणमध्ये जबरी चोरी; चांदीचे दागिने लंपास