नांदेड (प्रतिनिधी)- आसना ब्रिज परिसरात ऑटो चालकाला लुटणाऱ्या चौघांना पोलिसांनी त्वरित अटक केली आहे. तसेच दुसऱ्या स्वतंत्र घटनेत माहूर येथील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कार्यालयातून २ लाख २५ हजार रुपयांचे केबल वायर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ऑटो चालकाची लूट; आरोपी गजाआड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ प्रभाकर सोनाळे यांच्या ऑटोमध्ये दि. २० फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता तीन जण प्रवासी म्हणून बसले. त्यामध्ये चमकौर सिंग (वय २७), चमकुर सिंग बलकार सिंग (वय २५) व गुरुप्रीत सिंग (वय २०, सर्व रा. पंजाब राज्य) यांचा समावेश आहे. आसना ब्रिजजवळ पोहोचल्यानंतर आरोपींनी सोनाळे यांच्या खिशातील १,७०० रुपये रोख रक्कम व ७,००० रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ८,६०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर चौघे दुचाकीवरून पसार झाले. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली.या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक ६१/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत. माहूर येथे बीएसएनएल कार्यालयातून केबल चोरी दरम्यान, रमेश बाबू आंधळे (उप अभियंता, बीएसएनएल) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २० जानेवारीच्या रात्री माहूर येथील बीएसएनएल उपविभाग कार्यालयाच्या खिडकीचे गज वाकवून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. कार्यालयातील सुमारे ४५ मीटर लांबीचे केबल वायर, किंमत अंदाजे २ लाख २५ हजार रुपये, चोरी करून नेण्यात आले. या प्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९/२०२६ दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,594 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गोदावरीत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा कारवाईचा भडका; लाखोंचे साहित्य जप्त व नष्ट बांदा येथील अत्याचार प्रकरणात न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; पती-पत्नीला मृत्युदंड