स्वच्छतेतून समाजप्रबोधन
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११:०० वाजता स्व. बबन खंडू दरेगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर सोनू दरेगावकर यांचे कुटुंबीय व गावातील तरुण मंडळाने एकत्र येत गावातील मुख्य रस्ते, मंदिर परिसर आणि सार्वजनिक विहिरीची स्वच्छता केली. केवळ स्वच्छताच नाही, तर ‘प्लास्टिकमुक्त गाव’ करण्याचा संकल्पही यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने केला.
गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या अभियानात सुप्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट दत्तप्रसाद तालीमकर, मनोज वाघमारे, माजी सरपंच देविदास पाटील भोपाळे, रावसाहेब पाटील शिंदे, माजी सरपंच प्रदीप पाटील शिंदे, किशन पाटील शिंदे, नारायण बैलके, मोहन बैलके, गोविंदराव पाटील शिंदे, मोहन पाटील शिंदे, श्रीराम पाटील शिंदे, सुभाष पाटील चिंचाळे, रामेश्वर घोनशेटवाड, मनोहर तेलंग, उत्तम बैलके, पिराजी खाकरे, नरहरी कानगुले, मारोती रामशेटवाड, नागोराव चिंतेवाड, गोविंद रामशेटवाड, दशरथ बैलके, दिगंबर बैलके, दत्ता बैलके, संतोष बैलके, साईनाथ बैलके, चंद्रप्रकाश पाटील शिंदे, पुंडलिक पाटील शिंदे, सतीश पाटील शिंदे, मधुकर पाटील शिंदे, शंकर भोपाळे, भास्कर वाघमारे, विलास वाघमारे, किशन बैलके, शुभम बैलके, विकास बैलके, गजानन गारोळे, गंगाधर धोंडकर, नागेश दरेगावकर यांच्यासह गावातील तरुणांनी परिश्रम घेतले.

