नांदेड (प्रतिनिधी)- नायगाव तालुक्यातील दरेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी सरपंच जनसेवक स्व. बबन खंडू दरेगावकर यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त, त्यांचे सुपुत्र तथा युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्या पुढाकाराने १९ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण गावात ‘स्वच्छता अभियान’ राबवण्यात आले. वडिलांच्या स्मृती जपत स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या विधायक उपक्रमातून ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या लोकनेत्याला आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली. स्वच्छतेतून समाजप्रबोधन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११:०० वाजता स्व. बबन खंडू दरेगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर सोनू दरेगावकर यांचे कुटुंबीय व गावातील तरुण मंडळाने एकत्र येत गावातील मुख्य रस्ते, मंदिर परिसर आणि सार्वजनिक विहिरीची स्वच्छता केली. केवळ स्वच्छताच नाही, तर ‘प्लास्टिकमुक्त गाव’ करण्याचा संकल्पही यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने केला. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या अभियानात सुप्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट दत्तप्रसाद तालीमकर, मनोज वाघमारे, माजी सरपंच देविदास पाटील भोपाळे, रावसाहेब पाटील शिंदे, माजी सरपंच प्रदीप पाटील शिंदे, किशन पाटील शिंदे, नारायण बैलके, मोहन बैलके, गोविंदराव पाटील शिंदे, मोहन पाटील शिंदे, श्रीराम पाटील शिंदे, सुभाष पाटील चिंचाळे, रामेश्वर घोनशेटवाड, मनोहर तेलंग, उत्तम बैलके, पिराजी खाकरे, नरहरी कानगुले, मारोती रामशेटवाड, नागोराव चिंतेवाड, गोविंद रामशेटवाड, दशरथ बैलके, दिगंबर बैलके, दत्ता बैलके, संतोष बैलके, साईनाथ बैलके, चंद्रप्रकाश पाटील शिंदे, पुंडलिक पाटील शिंदे, सतीश पाटील शिंदे, मधुकर पाटील शिंदे, शंकर भोपाळे, भास्कर वाघमारे, विलास वाघमारे, किशन बैलके, शुभम बैलके, विकास बैलके, गजानन गारोळे, गंगाधर धोंडकर, नागेश दरेगावकर यांच्यासह गावातील तरुणांनी परिश्रम घेतले. Kanthak Suryatal Post Views: 763 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा प्लास्टिक नको, पृथ्वी निवडा ; नांदेडमध्ये विद्यार्थ्यांची सामाजिक जनजागृती