एपस्टीन फाईल्स वरून जनतेचे लक्ष विकेंद्रित करण्यासाठी केंद्र सरकारने युजीसी बाबत आंदोलनाचा खेळ केला –  ॲड.प्रकाश आंबेडकर 

संविधान विरुद्ध मनुवाद: प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा आणि सत्तेला दिलेले धारदार आव्हान विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना University of Lucknow येथे सन्मानासाठी बोलावले असताना त्यांनी स्पष्ट सांगितले होते. देशात दोन कायदे चालतात: एक संविधानाधिष्ठित आणि दुसरा मनू स्मृतिप्रणीत. काही संघटना मनुवादी विचार पुढे रेटत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. मात्र कोणता मार्ग स्वीकारायचा, हे त्यांनी जनतेवर सोडले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी News Tak ला दिलेल्या मुलाखतीत हा संदर्भ देत सांगितले आज प्रश्न आहे, जोर कोणाचा चालणार: संविधानाचा की मनुवादाचा?

संविधानावर सुरू असलेल्या चर्चांबाबत ते म्हणाले, आजोबांनी उत्तर दिले होते. आम्ही मंदिर बांधले; पण देव बसवण्याआधीच भूत आत जाऊन बसले. संविधान कितीही उत्तम असले, तरी ते चालवणारे चुकीचे असतील तर परिणामही चुकतो. भाषावार प्रांतरचनेबाबत बाबासाहेबांनी व्यक्त केलेली शंका आज खरी ठरताना दिसते, असे ते म्हणाले. उत्तर-दक्षिण भाषावाद वाढत आहे. Delimitation of States प्रक्रियेत दक्षिणेच्या जागा कमी, उत्तरेच्या वाढ हा वादग्रस्त मुद्दा आहे. कुटुंबकल्याण प्रभावीपणे राबवणाऱ्या राज्यांना शिक्षा होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि R S S यांचे संबंध दूरचेच राहिले, असे स्पष्ट करत ते म्हणाले आरएसएसची ना सामाजिक चळवळीची परंपरा, ना स्वातंत्र्यलढ्यात भूमिका. तरी आज बीजेपी बाबासाहेबांशी जवळीक दाखवण्याचा प्रयत्न करते.

आर्थिक धोरणांवर बोलताना त्यांनी बाबासाहेबांच्या The Problem of the Rupee चा संदर्भ दिला. रुपयाचे जागतिक नातेसंबंध समजून घेण्यात ना Jawaharlal Nehru यांनी गांभीर्य दाखवले, ना आजचे सरकार स्पष्ट दृष्टिकोन मांडते, असा त्यांचा आरोप. मायावती उत्तर प्रदेशात सत्तेवर आल्या; पण महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही. कारण महाराष्ट्र-गुजरातमध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या सुमारे ९–१० टक्के. या टक्केवारीवर सत्ताबदल शक्य नसला, तरी सामाजिक परिवर्तन शक्य आहे. उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये संख्याबळ जास्त असल्याने राजकीय यश मिळते. हा प्रयोग कांशीराम यांनी यशस्वी केला.

ते पुढे म्हणाले राजकारणात स्वच्छ प्रतिमा हीच ताकद. इतरांकडे काळा इतिहास आहे; तोच त्यांची अडचण. नवी पिढी आम्हाला कमी ओळखते, ही खंत त्यांनी व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सांगितले—फॉर्म ५४ आणि फॉर्म ४५ मध्ये गैरव्यवहार पकडता येतो; पण नोंदीच होत नाहीत. महाराष्ट्रात पाचनंतर ७५ लाख मतदानाचा हिशेबही स्पष्ट नाही. यूजीसीच्या नव्या नियमांवर ते म्हणाले—सवर्णांवर अन्याय होतोय हा कांगावा दिशाभूल करणारा आहे. शिक्षणक्षेत्रातील प्रतिनिधित्वाचे आकडे वेगळे चित्र दाखवतात. मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी हा खेळ असल्याचा आरोप त्यांनी केला.

संविधान बी. एन. राव यांनी लिहिले, ही चर्चा तथ्यहीन असल्याचे ते म्हणाले. B. N. Rau यांनी मसुदा प्रक्रियेत भूमिका बजावली; परंतु १९३५ नंतरच्या १७ समित्यांतील बाबासाहेबांच्या पायाभूत कामामुळेच त्यांना मसुदा समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचीच ओळख आहे. महानगरपालिका निवडणुकांत वंचित बहुजन आघाडी–काँग्रेस युती केंद्रीय पातळीवरून झाली; मात्र प्रभावी समन्वयाअभावी दोघांनाही फटका बसला, असे ते म्हणाले. देशातील इतर राज्यांत मदतीबाबत विचारले असता ते ठाम म्हणाले—मागणी आली तर मी मदतीस तयार आहे. माझी परंपरा स्वच्छ राजकारणाची आहे; तीच पुढच्या पिढीकडे देण्याचा माझा निर्धार आहे.

सोर्स – न्यूज तक ची लिंक …. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!