‘हिंद दी चादर’ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शिकलकरी वस्तीत जनजागृती उपक्रम

हिंगोली –  नांदेड येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे सन २०२५–२६ हे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असून, या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन व गुरु नानक नाम सेवा संगत (सिख, सिकलकरी, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल) तसेच इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी  येथील मोदी मैदान (सार्वजनिक बांधकाम विभागाची मोकळी जागा, आसर्जन) येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी आज हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली, कळमनुरी, बाळापूर व वसमत या तालुक्यातील विविध शिकलकरी वस्तीत ‘हिंद दी चादर’ या विशेष कार्यक्रमानिमित्त नांदेड क्षेत्रीय समितीचे अशासकीय सदस्य श्री. हरनाम सिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात स्मृतीचिन्ह व माहितीपर पॅम्पलेटचे वाटप करून नागरिकांना कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या वेळी हिंद दी चादर कार्यक्रमाचे उद्दिष्ट, ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व तसेच समाजात सद्भावना, बंधुता व एकतेचा संदेश देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!