शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे मनपा कार्यक्षेत्रातील सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांना आदेश
नांदेड – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम निश्चित करुन दिलेला असून गुरुवार, दिनांक १५.०१.२०२६ रोजी मतदान होणार असुन दिनांक १६.०१.२०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
तथापी दिनांक १४.०१.२०२६ रोजी मतदान साहित्य स्वीकृतीसाठी येणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी म्हणुन नियुक्त असणाऱ्या विविध महाविद्यालय व शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यास मतदान केंद्र ताब्यात घेणे कामी व इतर निवडणूक विषयक कामकाजासंबंधी अडचण येऊ नये यासाठी दिनांक १४.०१.२०२६ रोजी दुपार सत्रात सुट्टी देण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी असे आदेश जिल्हा परिषद च्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी दिनांक १३.०१.२०२६ रोजी निर्गमित केले आहेत. त्याअनुषंगाने मतदान केंद्रावर नियुक्त सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
