नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांमध्ये 1 मे 2025 पासून राबविण्यात आलेल्या अवैध व्यवसाय विरोधी अभियानात 15 हजार 840 गुन्हे दाखल करण्यात आले. 109 कोटी 72 लाख 45 हजार 163 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि 17 हजार 783 आरोपी आहेत.
पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालय नांदेड यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 मे 2025 पासून अवैध व्यवसायविरोधी अभियान राबविण्यात आले. ज्यामध्ये अवैध दारु, मटका, जुगार, लॉटरी, अंमलीपदार्थ, वेश्या व्यवसाय, अवैध वाळू वाहतुक अशा अनेक अवैध व्यवसायीकांविरुध्द कार्यवाही करण्यात आली. नांदेड जिल्ह्यामध्ये गुन्हे-4320 , जप्त मुद्देमाल-53 कोटी 68 लाख 65 हजार 843, आरोपी-5353. परभणी गुन्हे-3744, जप्त मुद्देमाल-19 कोटी 22 लाख 83 हजार 346, आरोपी-4126, लातूर गुन्हे-4166, जप्त मुद्देमाल 17 कोटी 88 लाख 52 हजार 519, आरोपी-4654. हिंगोली गुन्हे- 3610, जप्त मुद्देमाल-18 कोटी 92 लाख 43 हजार 455. आरोपी-3650 अशी कार्यवाही करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात गांजा आणि लातूर जिल्ह्यात एम.डी.ड्रग्स पकडले आहे. त्याची एकूण किंमत 22 लाख रुपये आहे. 123 व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे आणि 6 जणाविरुध्द एमपीडीए स्थानबध्दतेची कार्यवाही कर ण्यात आली आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी अवैध व्यवसायाची माहिती देण्यासाठी खबर या नावाची हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरीकांनी व्हाटसऍप क्रमांक 9150100100 वर अवैध व्यवसायाची माहिती द्यावी असे आवाहन शहाजी उमाप यांनी केले आहे. सोबतच संकेतस्थळ —- वर सुध्दा अवैध व्यवसायीकांची माहिती जनतेने द्यावी असे आवाहन करण्यात आले आह

