नांदेड – आपल्या भारत देशाला राजकिय राष्ट्रीय नेत्यांची खूप मोठी परंपरा असून आपल्या 94 वर्षाच्या आयुष्यामध्ये विविध राजकीय पदावर कार्य करून पंतप्रधान परदाच्या कार्यकाळात भारत देश मजबुत बनविण्यासाठी पोखरण अणु चाचणी, महिला सबलीकरण, अंत्योदय योजना, उदात्तीकरण, सुशासण राबवून कठोर तत्वानिंशी भारत देशाच्या विकासासाठी कार्य करणारे भारत देशाचे सामाजिक व राजकीय महान राष्ट्रीय नेते म्हणजेच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे होत, असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.25 डिसेंबर 2025 गुरूवार रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता हिंदी कवी, भारतरत्न, पद्मविभूषण, स्वतंत्र भारताचे अकरावे पंतप्रधान, लोकनेते अटल बिहारी वाजपेयी यांची 101 वी जयंती सुशासन (गुड गवर्नेस डे) म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
सर्व प्रथम रापम आगाराचे चार्जमन मा.श्री.संदिप बोधनकर यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी पुढे बोलताना ते आपल्या भाषणात यावेळी म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांनी परराष्ट्रमंत्री असतांना संयुक्त राष्ट्र संघात हिंदी भाषेमधून भाषण देणारे ते भारत देशाचे पहिले पंतप्रधान असून देश समृद्धीसाठी सुशासनावर भर दिला. सुशासन म्हणजे भारत देशात पारदर्शी व जबाबदारीपूर्वक नागरी सेवा देणे आणि विशेषतः युवा वर्गांना, विद्यार्थ्यांना अवगत करणे हा त्यांचा मुळ हेतू उद्देश होता. त्यांनी जय जवान, जय किसान, जय विज्ञानचा नारा दिला, अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा तुम्ही-आम्ही आपण सर्वांनीच आदर्श घेवून समाजाप्रती आणि देशाप्रती कार्य करण्याची हि काळाची गरज आहे, असेही मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी शेवटी बोलताना आपल्या भाषणात म्हणाले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून चार्जमन मा.श्री.संदिप बोधनकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड, पाळी प्रमुख मनोहर माळगे, वरिष्ठ लिपीक संतोष ढोले, सौ.सुनिता हूंबे, कृष्णा पवार, चालक त्र्यंबक गिते यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रापम आगारातील कष्टकरी, कामगार-कर्मचारी, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अटल बिहारी वाजपेयी हे भारत देशाचे सामाजिक व राजकिय महान राष्ट्रीय नेते-गुणवंत एच.मिसलवाड
