नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना नांदेड महानगर पालिकेचे काही कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी न राहता नगरसेवकांच्या घरी किंवा वैयक्तिक कामांमध्ये गुंतले असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, पालिकेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ज्या विभागात आणि ज्या कामासाठी झाली आहे, त्या ठिकाणीच त्यांनी नियमितपणे हजर राहणे आवश्यक आहे. रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा आदी कामांमध्ये विलंब होत असल्याने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रभागांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, पाणीपुरवठा विभागातील तक्रारींचे प्रलंबित काम, तसेच अभियांत्रिकी विभागातील विलंब यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “कर्मचारी जर नियुक्तीच्या ठिकाणीच उपलब्ध नसतील, तर सेवा सुरळीत कशा चालणार?” असा सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे.अनेक कर्मचारी काही जणांच्या पाठिंब्यावर आपले मूळ पद वगळता दुसऱ्याच पदावर काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आयुक्त साहेबांनी तातडीने याकडे लक्ष देऊन चौकशी करावी, संबंधितांवर कारवाई करावी आणि सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती व कामकाजावर कडक देखरेख ठेवावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने पारदर्शकता राखून जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. आता जनतेचे राज्य आले आहे मानपामध्ये अश्या परिस्थिती जनतेचं कामे महत्वाची असतांना नगरसेवकांच्या घरची कामे महत्वाची असा नवीन प्रश्न समोर येण्या अगोदर यावर कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे आहे.दरम्यान, या प्रकरणी पालिका प्रशासन काय भूमिका घेते आणि आयुक्तांकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. Kanthak Suryatal Post Views: 822 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हिमाचल पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या २० जवानांना ताब्यात घेतले;दोन राज्यांच्या पोलिसांची थेट टक्कर लोहा येथील लाच प्रकरणात ‘मुख्य आरोपी’ वाचला? तक्रारदाराचे शपथपत्र; एसीबीच्या कारवाईवर गंभीर प्रश्न