भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिण व लोहा तालुका शाखेचा कार्यक्रम
लोहा (प्रतिनिधी)- क्रांतीसुक्रांतीसुर्य बुद्ध विहार तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक लोहा येथे समता सैनिक दल पुर्व प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा नांदेड (दक्षिण) व लोहा तालुका शाखेने हे शिबिर आयोजित केले होते. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या संकल्पनेतून आणि समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गाव तेथे शाखा आणि घर तिथे सैनिक’ तयार करणे आणि समता सैनिक दल प्रत्येक तालुक्यामध्ये शंभर सैनिक तयार करून आपल्या समाजाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेत कार्यरत होऊन प्रत्येकाने उद्दिष्ट साध्य करायचा आहे. आणि त्याच अनुषंगाने या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा लोहाच्या वतीने एक दिवशीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सविस्तर वृत्त असे की, सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची दीपाने, धुपाने पुष्पाने पूजा करण्यात आली. त्यानंतर S.S.D. च्या ध्वजाचे ध्वजारोहण जिल्हा सरचिटणीस रत्नाकर महाबळे व जिल्हा संस्कार उपाध्यक्ष पि.एम वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.व लोहा तालुका अध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक बापूसाहेब कापुरे, तालुका सरचिटणीस तथा केंद्रीय शिक्षक धोंडिबा यानभुरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष लेफ्टनंट कर्नल संतोष दुंडे, लेफ्टनंट कर्नल आनंद झडते, आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी राहुल आत्राम सर यांनी सैनिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा संरक्षण सचिव तथा आकाशवाणी प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले, जिल्हा संघटक सुभाष खाडे, लोहा तालुका संस्कार उपाध्यक्ष शरद कापुरे, लोहा तालुका संरक्षण उपाध्यक्ष गुणवंत गच्चे, संरक्षण सचिव सिध्दार्थ ससाणे, कंपनी कमांडर तेजस्वीनी मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
या समता सैनिक दल शिबिरामध्ये सिंगल लाईन, एक से आगे तक गिनती, एक से दो तक गिनती, इन थ्रिज फाईल , दहिने मुड,बाए मुड, पिछे मुड, तेज चल, कदम ताल, जनरल सलामी, दहिना सॅल्युट,बाया सॅल्युट, लाईन तोड, विसर्जन, प्रथम उपचार, पि.टी., इत्यादी ड्रिलसह कायदेविषयक मार्गदर्शन मेजर आणि प्रशिक्षक यांनी प्रशिक्षणार्थी यांना दिले. या गावाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा. आशा या शिबिरात १४ महिला आणि २३ पुरुष असे एकूण ३७ प्रशिक्षणार्थीने सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षण देण्यासाठी लेफ्टनंट कर्नल तथा केंद्रीय शिक्षक संतोष दूंडे आणि समता सैनिक दलाचे लेफ्टनंट कर्नल आनंद झडते यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये महिला व पुरुष असे एकुण २० सैनिकांनी प्रशिक्षण घेतले.तसेच लोहा तालुका व शहर कार्यकारिणी आणि श्रध्दावान बौद्ध उपासक उपासिका यांनी अथक परिश्रम करून हे शिबीर यशस्वी केले.
