नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलिसांनी अत्याचार प्रकरणातील एका ४२ वर्षीय आरोपीस परभणी येथून अटक केली आहे. या प्रकरणात आरोपी बालाजी विजयकुमार मंगरूळे (वय ४२) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एफ), ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा १८ डिसेंबर २०२५ रोजी नोंदविण्यात आला होता.पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले यांनी दिलेल्या अहवालानुसार, आरोपी परभणी येथे असल्याची तांत्रिक माहिती मिळाल्यानंतर पोलीस उप अधीक्षक रामेश्वर व्येंजने पोलिस निरीक्षक संतोष तांबे, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध पथक तयार करण्यात आले.या पथकात सहायक पोलीस निरीक्षक अनुपमा केंद्रे,पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, विनोद देशमुख, विशाल माळवे, गजानन किडे, राजीव घुले, व्यंकट गंगुलवार, विष्णुकांत मुंडे, राहुल लाटकर, देवसिंग सिंगल, नागनाथ चापके, दीपक घोडणे आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पथकाने परभणी येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतले व पुढील तपासासाठी त्याला नांदेड येथे आणण्यात आले आहे.सदर प्रकरणात आरोपी बालाजी मंगरूळ याच्याविरोधात पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
More Related Articles
भाग्यनगर पोलीसांनी दहा लाखांचा ट्रक आणि नऊ लाखांच्या म्हशी पकडल्या
नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी दहा लाखांचा ट्रक आणि 9 लाखांच्यज्ञा म्हशी असा मुद्देमाल पकडून गुजरात राज्यातील तीन…
भोकर तालुक्यात 2 लाख 81 हजारांच्या दोन चोऱ्या
नांदेड(प्रतिनिधी)-मौजे सावरगाव मेट ता.भोकर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 61 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे.…
अर्धापूर-शनि पार्डी रस्त्यावर जबरी चोरी; बारडमध्ये बिअर बार फोडले; कौठा बसस्थानकात महिलेचे दागिने चोरले
नांदेड (प्रतिनिधी)- अर्धापूर शनि पार्डी जाणाऱ्या रस्त्यावर एका 25 वर्षीय शेतकऱ्याला अडवून चार जणांनी त्याच्या…
